honey trap

युवतीचा मित्र सोमनाथ शेडगे यांच्या संपर्कातून कांडगे व मोहिते १० एप्रिल रोजी हनी ट्रॅपची सुपारी देण्यासाठी त्या युवतीच्या घरी गेले होते . त्यानंतर १५ एप्रिल रोजी शैलेश मोहिते याने युवतीच्या प्लॅटमध्ये घुसून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला , अश्लील भाषेत संभाषण करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत मोबाइलवरूनही अश्लील चॅटिंग केले . राहुल कांडगे याने दि १७ रोजी रात्री तीन वाजता युवतीच्या घरात घुसून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला . संबधितांवर युवतीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून सातारा तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत

    सातारा : खेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते पाटील व चाकणचा माजी नगरसेवक राहुल कांडगे याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

    हनी ट्रॅप प्रकरणाची ज्या युवतीला सुपारी संशयितांनी सुपारी दिली होती त्याच युवतीने या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे . फिर्यादीच्या तक्रार अर्जानुसार या युवतीचा मित्र सोमनाथ शेडगे यांच्या संपर्कातून कांडगे व मोहिते १० एप्रिल रोजी हनी ट्रॅपची सुपारी देण्यासाठी त्या युवतीच्या घरी गेले होते . त्यानंतर १५ एप्रिल रोजी शैलेश मोहिते याने युवतीच्या प्लॅटमध्ये घुसून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला , अश्लील भाषेत संभाषण करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत मोबाइलवरूनही अश्लील चॅटिंग केले . राहुल कांडगे याने दि १७ रोजी रात्री तीन वाजता युवतीच्या घरात घुसून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला . संबधितांवर युवतीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून सातारा तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत