बोंबाळे (भाग्यनगर): अध्यक्ष निवडीनंतर जल्लोष करताना कार्यकर्ते
बोंबाळे (भाग्यनगर): अध्यक्ष निवडीनंतर जल्लोष करताना कार्यकर्ते

निंमसोड जिल्हा परिषद गटात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बोंबाळे विकास सेवा सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक साडेचार वर्षांपूर्वी बिनविरोध झाली होती. त्यावेळी ठरल्यानुसार अध्यक्ष प्राचार्य आनंदराव घोरपडे व उपाध्यक्ष नारायण इंगवले यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आर.आर.राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची सभा बोलवण्यात आली.

    कातरखटाव :बोंबाळे (भाग्यनगर ता.खटाव ) येथील विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी कुदळे यांची बहुमताने तर उपाध्यक्ष पदी मनोहर नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    निंमसोड जिल्हा परिषद गटात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बोंबाळे विकास सेवा सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक साडेचार वर्षांपूर्वी बिनविरोध झाली होती. त्यावेळी ठरल्यानुसार अध्यक्ष प्राचार्य आनंदराव घोरपडे व उपाध्यक्ष नारायण इंगवले यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आर.आर.राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची सभा बोलवण्यात आली.तेरापैकी दोन संचालक मयत असल्याने आकरा संचालक सभेसाठी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदा साठी तानाजी कुदळे व सेवानिवृत्त तलाठी अशोक बाजीराव निंबाळकर यांनी अर्ज दाखल केले. कोणीही माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले .यामध्ये कुदळे यांना आठ तर निंबाळकर यांना केवळ तीन मते मिळाल्याने अध्यासी अधिकारी राठोड यांनी कुदळे यांच्या निवडीची घोषणा केली. तर उपाध्यक्ष पदासाठी मनोहर नलवडे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली

    या निवडीसाठी मावळते उपाध्यक्ष नारायण इंगवले,पोपट निंबाळकर,संभाजी निंबाळकर,सुनीता रासकर,रामहरी निंबाळकर,विजय गलांडे यांनी सहकार्य केले. पदाधिकारी निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे युवा नेते प्रसाद निंबाळकर,धनंजय निंबाळकर, ग्रा.प.सदस्य प्रा.डॉ.पांडुरंग निंबाळकर,विजयकुमार निंबाळकर ,डॉ. वैभव निंबाळकर ,मनोहर निंबाळकर,निळकंठ निंबाळकर ज्योतीराम कुदळे ,बाजीराव नलवडे ,प्रल्हाद सुतार ,शिवाजी घोरपडे ,मधू सूर्यवंशी ,केशव घोरपडे,गोट्या पाटील ,मारुती फडतरे, प्रशांत निंबाळकर,रमाकांत निंबाळकर,श्रीरंग दुबळे,संतोष नलवडे,प्रकाश नलावडे ,जीवन जाधव,आनंद रासकर,दीपक निंबाळकर,मारुती देशमुख,संजय इंगवले,दगडू गलांडे,अधिकराव गलांडे ,आदीसह ग्रामस्थ व मुंबईकर मंडळींनी अभिनंदन केले.