थाई बॉक्सिंग विभागीय स्पर्धा महाबळेश्वरात संपन्न

या स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातून सात जिल्हयातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे चषक सातारा जिल्हा, द्वितीय क्रमांक कोल्हापूर जिल्हा व तृतीय क्रमांक सांगली जिल्हयांनी पटकावला. यामध्ये मुलींच्या गटात बेस्ट फायटर सना शेख व मुलांच्या गटात शिवम येवले यांनी हा मान मिळविला.

    वाई : थाई बॉक्सिंग असोसिएशन सातारा यांच्या अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या आठव्या विभागीय थाई बॉक्सिंग कीडा स्पर्धा नुकतीच गिरीस्थान प्रशाला व ज्युनिअर कॉलेज महाबळेश्वर येथे मोठया उत्साहात संपन्न झाल्या.

    स्पर्धेचे उदघाटन नगरसेवक कुमार शिंदेआजी सैनिक सुनिल महांगडे युवा उदयोजक नितीन दौंड, विशाल शिर्के, संदीप महांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातून सात जिल्हयातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे चषक सातारा जिल्हा, द्वितीय क्रमांक कोल्हापूर जिल्हा व तृतीय क्रमांक सांगली जिल्हयांनी पटकावला. यामध्ये मुलींच्या गटात बेस्ट फायटर सना शेख व मुलांच्या गटात शिवम येवले यांनी हा मान मिळविला.महिला दिनानिमित्त यावेळी माजी जि. प. अध्यक्ष अरूणादेवी पिसाळ ,पंचायत समिती सदस्य सुनिताकांबळे, अॅड अमृता गाढवे, तसेच कीडा क्षेत्रात सफिया।शेख , कॉन्स्टेबल ज्योती शिर्के यांना मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले.विजेत्या स्पर्धकांना  अरूणादेवी पिसाळ,सुनिताकांबळे , राष्ट्रवादी युवक कॉ.अध्यक्ष रोहित ढेबे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

    स्पर्धेसाठी पंच वजीर शेख, विशाल वाडकर सातारा, आदिक पाटीलसांगली, शामराव पाटील कोल्हापूर यांनी काम पाहिले केले.स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी क्रिडा शिक्षक मुकुंदमाळी , सुनिल गुरव , प्रगोद निकम , अक्षय साळूखे, अक्षय राजपुरे यांनी विशेष प्रयत्न केले. सुत्र संचालन रविराज गाढवे सर व आभार प्रदर्शन सचिन लेंभे यांनी केले.