भोर येथून वाईकडे कोरोना रुग्णाला घेवून जात असताना घाटातच रुग्णवाहिका पलटी झाल्याने खळबळ

सध्या वाई, खंडाळा, शिरवळ, महाबळेश्वर, पाचगणी, भोर या तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या व या ठिकाणी बेड व आवश्यक ऑक्सी जन, व्हेंटिलेटर असे विविध कोरोना रुग्णाला आवश्यक असणारी यंत्रणा अपुरी पडत असल्याने रुग्ण जगावा या भावनेपोटी डॉक्टर लोक शाश्वत मिळणाऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करण्याची स्पर्धा लागलेली असते.

    वाई : पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोर येथून ऑक्सीजन लावून एक कोरोना रुग्णाला घेवून वाईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात होवून पलटी झाल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    सविस्तर वृत्त असे की, भोर येथील एक कोरोना बाधित असलेला रुग्ण त्यास ऑक्सी जन लावून वाईच्या घोटावडेकर हॉस्पिटल मध्ये मी सातारकर प्रतिष्ठान खंडाळा असे रुग्णवाहिके वर लिहिलेल्या रुग्णवाहिका क्रमांक MH०१BS०११३ मधून वाई कडे भरधाव वेगात जात असताना ही रुग्णवाहिका आज दिनांक २६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर असणाऱ्या खंबाटकी घाटाच्या मध्यभागी आली असताना नुकताच पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ता घसरटा झाल्यामुळे यावरील चालक असलेला सागर अलगुडे याचा भरधाव वेगात निघालेल्या रुग्णवाहिके वरील ताबा सुटल्याने ही रुग्णवाहिका डोंगर कड्यावर जावून आदळून ती पलटी झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांमधून एकच कल्लोळ निर्माण झाला. पण दुर्दैवाने या अपघातग्रस्त रुग्णवाहिकेमध्ये कोरोना रुग्ण असल्या कारणाने तो गाडीतच मार लागलेल्या अवस्थेमध्ये पडून राहिला व मला वाचवा असे तो ओरडत असून देखील त्याचा आवाज आधीच खोल गेल्याने तो बाहेरील लोकांना ऐकू येत नव्हता. त्यामुळे त्याची ऑक्सी जन लेवल पहिल्यापासूनच कमी असल्याने त्याचे प्राण वाचवण्यासाठी भोर येथील डॉक्टरांनी त्याला आधीच चांगला उपचार मिळवा या भावनेपोटी आणि त्यांना व्हेंटिलेटर ची गरज असल्यामुळे वाईच्या घोतावडेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी ही रुग्णवाहिका निघाली होती. पण रस्त्यातच आडवी झाल्याने व त्यात कोरोना रुग्ण असल्यामुळे त्याच्याजवळ त्याला वाचविण्यासाठी कोणीही पोहोचण्याचे धाडस करत नव्हते.

    या अपघाताची खबर खंडाळा पोलीस ठाणे आणि जोशी विहीर येथील महामार्ग पोलीस यांना समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल होवून दुसरी रुग्णवाहिका मागवून हा रुग्ण वाईच्या घोटवडेकर हॉस्पिटलकडे पोलिसांनी रवाना केला. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

    सध्या वाई, खंडाळा, शिरवळ, महाबळेश्वर, पाचगणी, भोर या तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या व या ठिकाणी बेड व आवश्यक ऑक्सी जन, व्हेंटिलेटर असे विविध कोरोना रुग्णाला आवश्यक असणारी यंत्रणा अपुरी पडत असल्याने रुग्ण जगावा या भावनेपोटी डॉक्टर लोक शाश्वत मिळणाऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करण्याची स्पर्धा लागलेली असते. त्यासाठी रुग्णवाहिके चा सर्रास वापर केला जातो. पण रुग्णवाहिकेचे चालकच बेजबाबदार पणाने भरधाव वेगात रुग्णवाहिका हाकून रुग्णाचा प्राण घेतली की काय? असा प्रश्न आता रुग्णांच्या पालकांमधून निर्माण झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. आधीच हॉस्पिटल मधून कोरोना रुग्णांना मिळणारी आवश्यक व्यवस्था हिच अपुरी पडत असल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये हजारो रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.