कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले, परंतु कोरोनामुळे पर्यटकांनी फिरवली पाठ

दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा कास पठारावर असते. हजारो-लाखो लोक कास पठारावरिल मनमोहक दृष्य न्याहाळायला येत असतात. परंतु या वर्षी कोरोनाने आपले रौद्ररुप धारण केले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिने पर्यटन स्थळेही सरकारने बंद ठेवली आहेत. त्यामुळे कास पठार पर्यटकांविना ओस पडले आहे.

सातारा : कोरोनाने राज्यासह देशात थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. साताऱ्यातील कास पठारावर निसर्गाला बहर आला आहे. (Cas Plateau blossomed with colorful flowers) येथील कास पठार दरवर्षीप्रमाणे यंदाही डौलले आहे. विविध रंगी फुलांनी बहरले आहे. साताऱ्यातील कास पठार हे जागतिक दर्जाचे आहे. इथे दरवर्षी सप्टेंबर दरम्यान विविध रंगांची फुले फुलण्यास सुरुवात होते. मात्र, या वर्षी पर्यटकांनी (tourists) कोरोनामुळे पाठ फिरवली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा कास पठारावर असते. हजारो-लाखो लोक कास पठारावरिल मनमोहक दृष्य न्याहाळायला येत असतात. परंतु या वर्षी कोरोनाने आपले रौद्ररुप धारण केले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिने पर्यटन स्थळेही सरकारने बंद ठेवली आहेत. त्यामुळे कास पठार पर्यटकांविना ओस पडले आहे.

कास पठारावर तेरडा, पंद, टुथब्रश, सोनकी, कुमुदिनी, अभाळी, गवेली, अबोलिमा, चवर अशा अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या वनस्पतींना बहर आला आहे. त्यामुळे कास पठार फुलांनी नटले सवरले आहे. असे वाटत आहे. जागतिक वारसास्थळ आणि आतंरराष्ट्रीय जैवविविधता असलेल्या कास पुष्प पाठारावर रंगीबेरंगी फुलांचा हंगाम दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी असतो. मात्र यंदा कोरोनाचे सावट घोंगावत असल्यामुळे पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास सक्त मनाई केली आहे.