गावाच्या विकासाचा रथ पुढे नेणार : सरपंच दत्ता शिंदे

    म्हसवड : माण तालुक्यातील विकासाच्या वाटेवरील गाव म्हणून ढाकणीची ओळख आहे . प्रगल्भ राजकीय मार्गदर्शन व गावकऱ्यांची विकास कामांची एकवाक्यता यामुळे सरपंच या नात्याने गावाच्या प्रगतीचा जगन्नाथ रुपी रथ मी मोठया जिद्दीने पुढे नेणार आहे . विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख व सुभाष नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांसाठी सक्रीय राहणार असल्याची ग्वाही ढाकणीचे सरपंच दत्ता शिंदे यांनी दिली.

    करोनाच्या महामारीत झालेल्या निवडणुकीनंतर सरपंच पदाची जवाबदारी आल्यावर नागरिकांना या महामारीपासून वाचविणे हे विकास कामांसमवेत मुख्य उदिष्ट होते . गावात सॅनिटायझेशन व शंभर टक्के, मास्क वाटप, व स्पीकरद्वारे गावात जनजागृती  लसीकरणाचे प्रयत्न केले . याशिवाय गावात बंदिस्त गटार, हाय मास्ट पोल, शिंदे मळा येथे ओढयावर साकव पूल, सिध्दनाथ मंदिराच्या पिछाडीला सिमेंट बंधारे, बेंद वस्तीच्या कॅनॉल वर सिमेंट पूल, बरबटवाडी ते जानकर वस्ती येथे मुरमीकरण व स्मशानभूमी बांधणे,ढाकणी ते गटेवाडी रस्ता डांबरीकरण, गावातील अंर्तगत रस्त्यांचे काँक्रिटीकरण या सर्व प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी ग्रामपंचायत प्रशासन व सदस्य यांचे समन्वयाने काम सुरू आहे .

    ढाकणी ग्रामपंचायतीसाठी जास्तीत जास्त  विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्धार आहे. विकासाच्या नव्या योजना, सिंचनाची स्वयंपूर्ण ता याशिवाय पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण, तसेच करोना मुक्त गाव ठेवणे याशिवाय विलगीकरण कक्षाचे अद्ययावतीकरण या कामावर विशेष लक्ष आहे . ढाकणी ग्रामपंचायत माण तालुक्यात लक्षवेधी राहिल हाच आमचा प्रयत्न आहे.

    (शब्दांकन : महेश कांबळे, म्हसवड)