चतुरबेटचा पुल सलग ३ दिवस पाण्याखाली, प्रवाहाने पुलावरील रस्ता गेला वाहून

  • तालुक्यातील ५० गावांना जोडणारा मौजे चतुरबेट येथील दगडी पुल हा अत्यंत धोकादायक स्थितीत आला आहे. हा पुल कधीही ढासळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा पुल नदीच्या पाण्याखाली गेल्याने प्रवाहामुळे पुलावरील डांबर वाहून गेले आहे. पुलावरील डांबर वाहून गेल्याने लोखंडी सळ्या उघड्यावर पडल्या आहेत. सळ्यांमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. येथील स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्ग नसल्याने जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करतात.

चतुरबेट : महाबळेश्वर शहरासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सलग कोसळधार पावसामुळे नाल्यांना व रस्त्यांना ओढ्यांचे स्वरुप आले आहे. या पाण्यातुन मार्ग काढताना वाहनचालाकांची तारांबळ उडत आहे. महाबळेश्वरमधील कांदाटी खोऱ्यातील कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीला पुर आल्याने तालुक्यातील पश्चिम भागातील चतुरबेट ते आहिर या गावांना जोडणारा दगडी पुल पाण्याखाली गेला आहे. 

तालुक्यातील ५० गावांना जोडणारा मौजे चतुरबेट येथील दगडी पुल हा अत्यंत धोकादायक स्थितीत आला आहे. हा पुल कधीही ढासळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा पुल नदीच्या पाण्याखाली गेल्याने प्रवाहामुळे पुलावरील डांबर वाहून गेले आहे. पुलावरील डांबर वाहून गेल्याने लोखंडी सळ्या उघड्यावर पडल्या आहेत. सळ्यांमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. येथील स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्ग नसल्याने जीव मुठीत घेऊन या पुलावरुन प्रवास करावा लागतो. 

कोरोनामुळे एसटी वाहतुकही बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशात कोसळधार पावसामुळे पुल ढासळल्यास पुढील ५० गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे. अश्या बिकट परिस्थितीत गावांतील गर्भवती, प्रोढ व्याक्तींना वैद्यकीय सुविधा मिळणार नाहीत तसेच अन्य कामांविषयीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात हा पूल नुकसानग्रस्त झाला होता. परंतु प्रशासनाने तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरळीत केली नाही, शेतीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गाला औषधी,खते नेण्यास  पुलामुळे वाहतूक खोळंबल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्याची शेती नदीच्या पलीकडे आहे.शेती साहित्य,बैलजोडी नेण्यास अडचण निर्माण होत आहे.आकस्मिक काळात किंवा रुग्णांना मार्ग बंद असल्यामुळे उपचाराला सुद्धा मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने नवीन पूल बांधण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. प्रशासनाचे अती महत्वाच्या बाबी कडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. एखादी दुर्घटना किंवा जिवीतहानी झाल्याशिवा प्रशासनाला जाग येणार नाही. तसेच महाड (सावित्री नदी) सारखी स्थिती निर्माण होण्याची वाट प्रशासन पाहत आहे. अशी भावना स्थानिक व्यक्त करत आहेत.