प्रतीकात्मक फोटो 
प्रतीकात्मक फोटो 

संबधित शेतकऱ्याने सातारा एसीबीकडे तक्रार केली होती. मिळालेल्या तक्रारीनुसार सातारा एसीबीच्या पथकाने वडूज पंचायत समिती परिसरात सापळा लावून लोहारा हा पैसे मागत असल्याची पडताळणी केली.त्यानंतर तक्रारदार शेतकऱ्याकडून लाच म्हणून साडे आठ हजार रूपये घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या लोहारा याच्याकडे चौकशी करून त्याच्याविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सातारा : जिल्हा परिषदेतून अनुदानावर वस्तू खरेदी करण्यास मदत करण्याच्या बदल्यात खटाव तालुक्‍यातील एका शेतकऱ्याकडून साडे आठ हजारांची लाच घेताना खटाव पंचायत समितीचा लिपीक रविकांत नारायण लोहारा याला सातारा एसीबीने रंगेहात पकडले असून त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कारवाई वडूज येथे झाली असली तरी खळबळ जिल्हा परिषदेत उडाली आहे.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्‍यातील एका शेतकऱ्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उसाचे रस यंत्र खरेदी करायचे होते. त्यासाठी त्याने वडूज पंचायत समितीत अर्ज केला होता. सदर अर्ज लिपीक रविकांत लोहारा याच्याकडे आल्यानंतर त्याने जिल्हा परिषदेच्या वीस टक्के या योजनेतून उसाचे रस यंत्र खरेदी करण्यासाठी मदत करण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे साडे आठ हजार रूपयांची मागणी केली होती.

    यानंतर संबधित शेतकऱ्याने सातारा एसीबीकडे तक्रार केली होती. मिळालेल्या तक्रारीनुसार सातारा एसीबीच्या पथकाने वडूज पंचायत समिती परिसरात सापळा लावून लोहारा हा पैसे मागत असल्याची पडताळणी केली.त्यानंतर तक्रारदार शेतकऱ्याकडून लाच म्हणून साडे आठ हजार रूपये घेताना त्याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या लोहारा याच्याकडे चौकशी करून त्याच्याविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, हवालदार भरत शिंदे, संभाजी काटकर, तुषार भोसले यांनी केली.