पुतळ्याच्या उद्घाटनावरून झालेला वाद दुर्दैवी; अहिल्यादेवींच्या नावाचा वापर राजकारणासाठी कोणी करू नये – यशवंतराव होळकर

आमच्या घराला लाभलेला ऐतिहासिक वारसा आम्ही पुढे समर्थपणे चालवीत असून राजकारणात येण्यापेक्षा सामाजिक कार्यद्वारे आम्हाला पुढे यायचे आहे अहिल्या देवीच्या विचाराची व्यापकता सर्वदूर पोचविणार असून फलटण तालुक्यातील होळ मुरूम येथे आमच्या पूर्वजांचे ऐतिहासिक महत्त्व जतन करण्यासाठी आम्ही योग्य ती मदत करू अशी ग्वाही यशवंतराव होळकर यांनी दिली.

    फलटण: जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून झालेला वाद दुर्दैवी असून यामध्ये राजकारण आणणे हे चुकीचे आहे अहिल्यादेवींच्या नावाचा वापर राजकारणासाठी कोणी करू नये, असे आवाहन अहिल्यादेवी होळकर घराण्याचे वंशज यशवंतराव होळकर यांनी केले आहे.
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व समाजाच्या हितासाठी काम केले त्यांचा सामाजिक वारसा आमचे घराणे समर्थपणे पुढे चालवित असून जेजुरी येथे त्यांच्या पुतळ्यावरून झालेला वाद हा चुकीचा आहे. राजकारणात त्यांच्या नावाचा वापर होऊ नये योग्य व्यक्तीच्या हस्तेच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण काल आमच्या उपस्थितीत झालेले आहे त्यामुळे हा वाद इथेच थांबवावा त्यांचे नाव घेऊन आरोप प्रत्यारोप करू नये असे आवाहन यशवंतराव होळकर यांनी केले
    आमच्या घराला लाभलेला ऐतिहासिक वारसा आम्ही पुढे समर्थपणे चालवीत असून राजकारणात येण्यापेक्षा सामाजिक कार्यद्वारे आम्हाला पुढे यायचे आहे अहिल्या देवीच्या विचाराची व्यापकता सर्वदूर पोचविणार असून फलटण तालुक्यातील होळ मुरूम येथे आमच्या पूर्वजांचे ऐतिहासिक महत्त्व जतन करण्यासाठी आम्ही योग्य ती मदत करू अशी ग्वाही यशवंतराव होळकर यांनी दिली. धनगर हा एक हिंदू समाज आहे, जो प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो. धनगर समाजामधील लोकांचे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, गोवा या राज्यांसह इतर राज्यात सुद्धा वास्तव्य आहे. मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांनी धनगर समाजाच्या हितासाठी व धनगर समाजातील सर्व सामान्य नागरिक पुढे जाण्यासाठी जे काम केलेले आहे तेच डोळ्यासमोर ठवून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजातील बांधवांच्या उन्नतीसाठी आपण कार्यरत राहणार आहोत या समाजाचा st प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती यशवंतराव होळकर यांनी दिली.