हेच ते पाण्याविना कोरडे पडलेले चव्हाणवाडी ता. फलटण जवळील लेंढीचे धरण
हेच ते पाण्याविना कोरडे पडलेले चव्हाणवाडी ता. फलटण जवळील लेंढीचे धरण

धरणात पाणी असेल त्यावेळी धरणात मोटारी लावून पाणी ऊचलणाऱ्या बडया धेंडयावर संबधीत अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरीक यांचे मधून होत आहे- त्रस्त नागरीक आरडगांव, चव्हाणवाडी, कापडगांव तांबवे धरणात यावेळी पाणीसाठा भरपूर आहे यातील पाणी पोट फाटयाव्दारे सोडून लेंढीच्या धरणात सोडले तर चव्हाणवाडी व आरडगांवच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल.

    सुरेश भोईटे, लोणंद : चव्हाणवाडी ता. फलटण नजीक असणाऱ्या लेंढीच्या धरणालगत विहीर खोदून आरडगांव, चव्हाणवाडी, कापडगाव, या तिन्ही गावांनी पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा केला आहे .मध्यंतरीच्या पावसात हे धरण पाण्याने भरगच्च भरले होते. मात्र याच धरणात अनेक बडे धेंडे पाण्याच्या मोटारी लावून आपली शेती याच पाण्याने भिजवत असल्याने सद्या हे धरण कोरडे ठणठणीत पडले आहे.

    तांबवे ता. फलटण येथील पाण्याने भरगच्च भरलेले धरण याच धरणातून लेंढीच्या धरणात पाणी सोडणेची आरडगांव चांभारवाडी ग्रामस्थांची मागणी

    या धरणात लावल्या जाणाऱ्या मोटारी बंद केल्या तर धरणातील पाणी टिकून राहील त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या तिन्हीही गावांना येणार नाही . या तीनही गावातील सरपंच , ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांनी यावर ठोस भूमीका घेऊन धरणात लावल्या जाणाऱ्या मोटारी कायमच्या बंद कराव्यात. चव्हाणवाडी गावात दहा दिवसातून एकदाच वीस मिनिटे तर आरडगांवमध्ये चार दिवसातून एकदा अर्धा तास नळाला पाणी येत असल्याने या दोन्ही गावांना मोठया प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कापडगांवला पाण्याच्या दोन विहीरी असल्याने त्यांना एक दिवसाआड नळाला पाणी भरपूर येत असल्याने त्यांना सद्यातरी पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही.

    धरणात पाणी असेल त्यावेळी धरणात मोटारी लावून पाणी ऊचलणाऱ्या बडया धेंडयावर संबधीत अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरीक यांचे मधून होत आहे- त्रस्त नागरीक आरडगांव, चव्हाणवाडी, कापडगांव तांबवे धरणात यावेळी पाणीसाठा भरपूर आहे यातील पाणी पोट फाटयाव्दारे सोडून लेंढीच्या धरणात सोडले तर चव्हाणवाडी व आरडगांवच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. लवकरात लवकर सबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्यांने लक्ष देऊन तांबवे धरणातील पाणी सोडावे अशी आग्रही मागणी तिन्हीही गावातील नागरिकांमधून होत आहे.