जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान, तर सर्वसामान्य मजुरवर्गाचे हाल

राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार उडवला आहे त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकाडाऊन पडते की काय अशीच चर्चा सर्वत्र सुरु झाली होती, यापुर्वीच्या ८ महिन्याच्या लॉकाडाऊनच्या काळात सर्व जनता मेटाकुटीला आली होती त्या जनतेला शासनाने काडीचा आधार दिला त्या आधारावर सामान्य जनता कशीबशी तरली मात्र छोट्या मोठ्या उद्योगाची, व्यावसायिकाची व मजुरवर्गाची पुरती वाट लागली होती, लॉकडाऊननंतर पुन्हा परिस्थिती नियंत्रणात येताच शासनाने सर्वकाही हळुहळु अनलॉक केले त्यामुळे हळुहळु परिस्थिती मुळ पदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाच्या दुसर्या लाटेने डोके वर काढत राज्यात हाहाकार उडवुन दिला

    म्हसवड : राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने लॉकडाऊन टाळत कडक निर्बंध लावले आहेत या मध्ये शनिवारी व रविवारी पुर्नतह: लॉकडाऊन तर उर्वरीत दिवशी सर्व दुकाने सामाजिक अंतर ठेवुन सुरु राहतील त्यामध्येही सलुन, बार, रेस्टॉरंट हे बंद राहतील असा अद्यादेश जारी केला असताना अचानक जिल्हाधिकारी सातारा यांनी दि.५ रोजी नवीन अद्यादेश काढत संपूर्ण सातारा जिल्हाच अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असुन जिल्हाधिकार्यांच्या या निप्णयामुळे व्यापारीवर्गाचे खुप मोठे नुकसान होत आहे तर सर्वसामान्य मजुरवर्गाचे हाल सुरु झाले आहेत, त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा व जिल्हावासियांना दिलासा द्यावा अशी एकमुखी मागणी होवु लागली आहे.

    राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार उडवला आहे त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकाडाऊन पडते की काय अशीच चर्चा सर्वत्र सुरु झाली होती, यापुर्वीच्या ८ महिन्याच्या लॉकाडाऊनच्या काळात सर्व जनता मेटाकुटीला आली होती त्या जनतेला शासनाने काडीचा आधार दिला त्या आधारावर सामान्य जनता कशीबशी तरली मात्र छोट्या मोठ्या उद्योगाची, व्यावसायिकाची व मजुरवर्गाची पुरती वाट लागली होती, लॉकडाऊननंतर पुन्हा परिस्थिती नियंत्रणात येताच शासनाने सर्वकाही हळुहळु अनलॉक केले त्यामुळे हळुहळु परिस्थिती मुळ पदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाच्या दुसर्या लाटेने डोके वर काढत राज्यात हाहाकार उडवुन दिला त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरु होते की काय याची चिंता सर्वसामान्य जनतेला लागलेली असताना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व पक्षांशी चर्चा करीत राज्यातील जनतेशीही सुसंवाद साधत एक चांगला निर्णय घेतला तो म्हणजे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करायचे नाही तर अठवड्यातुन फक्त २ दिवस संपूर्ण लॉकडाऊन करायचे यामुळे सामान्य जनता व व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले होते, मात्र त्यांचे हे समाधान फार काळ टिकले नाही, मुख्यमंत्र्यांच्या‌ आद्यादेशानंतर सोमवार दि.५ रोजीच्या रात्री सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी नवा अद्यादेश काढत संपुर्ण जिल्हाच लॉकडाऊन केला, यामध्ये नवीन बदल करीत फक्त भाजी मंडई, किराणा दुकान व औषधाच्या दुकानांना सवलत दिली आहे, जिल्हाधिकार्यांच्या या नव्या आदेशामुळे मात्र व्यापारी वर्गात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे तर मजुरवर्गही हवालदिल झाला आहे.

    जिल्हाधिकार्यांच्या नव्या आदेशानुसार वरील सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार असेल तर मग मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे शनिवार व रविवार काय बंद राहणार आहे असा मोठा संभ्रम जनतेत निर्माण झाला असुन एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेचा, व्यापारीवर्गाचा व मजुरवर्गाचा सहानभुती पुर्वक विचार करुन लॉकडाऊन टाळले तर दुसरीकडे मात्र जिल्हाधिकार्यांनी एकप्रकारे लॉकडाऊन करुन मारले असल्याचा सुर आता सर्वच स्तरातुन उमटु लागला आहे. जिल्हाधिकार्यांनी शासनाप्रमाणेच जनतेचा सहानभुतीपुर्वक विचार करुन आपला निर्णय परत घेत जिल्ह्यात अधिक कडक निर्बंध लावावेत ज्यामध्ये व्यावसायिक, छोटे दुकानदार, मजुरवर्ग यांनी कोरोनाची लस घेवुनच आपला व्यावसाय अथवा काम सुरु करावे, त्याबरोबरच कोरोनाच्या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्ती करावी असे काही कडक निर्बंध लावल्यास लोकांमध्ये चांगलीच जागृती तर होईलच याशिवाय कोणाचे फारसे नुकसान ही होणार नाही.

    म्हसवड शहरात सर्वकाही बंद
    जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या नवीन आदेशाचा पालिका प्रशासनालाही लवकर उलगडा न झाल्यामुळे मंगळवार दि.६ रोजी शहरातील सर्व दुकाने सुरु होती त्यानंतर दुपारी पालिका प्रशासनाने शहरात फिरुन सुरु असलेली सर्व दुकाने बंद केल्याने नागरीकांमध्ये संताप व संभ्रम निर्माण झाला आहे.

    गुडीपाडव्या तोंडावर लॉकडाऊन म्हणजे तोंड दाबुन बुक्क्याचा मार
    मराठी माणसाची अस्मिता व नवीन मराठी वर्षाचा शुभारंभ ज्या दिवशी होतो तो दिवस म्हणजे गुडीपाडवा या दिवशी प्रत्येक मराठी माणुस आपल्या नवीन उद्योगाची अथवा शुभकार्याची सुरुवात करीत असतो त्यामुळे या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे, याच सणाचा आधार घेत अनेक व्यावसाईकांनी आपल्या दुकानात माल भरलेला आहे, आता अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे भरलेल्या मालाचे काय करायचे या विवंचणेत व्यापारी सापडला असुन त्यांना यामुळे तोंड दाबुन बुक्क्याचा मार सोसावा लागणार आहे.

    मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश एक आहे तर जिल्हाधिकार्यांचा आदेश एक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवुन जर फक्त शनिवार, रविवार लॉकडाऊन केले असल्याचे जाहीर केले असताना जिल्हाधिकार्यांनी नवीन अद्यादेश काढला आहे त्यामुळे जनतेने कोणाचा आदेश मानायचा हा खरा प्रश्न आहे.

    -नितीन दोशी , माजी नगराध्यक्ष, म्हसवड

    “नव्याने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मध्ये नाभिक समाजावर मोठा अन्याय झालेला आहे. सलून व्यावसायिक च्या माध्यमातून हातावर पोट भरणारा समाज असून ९९टक्के लोकांचा उदरनिर्वाह सलून व्यवसायावर आहे. नियम व अटी घालून तसेच कायदा व व्यवहार यांची सांगड घालून सलून व्यावसायिकांना दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी याबाबत पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.”
    -प्रा. विश्वंभर बाबर – जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय कॉंग्रेस