death

शैक्षणिक गोष्टी बंद असल्यामुळे मुलांना विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (electronic medium) ऑनलाईन शिक्षण (online education) दिले जात आहेत. परंतु काही शेतकरी, कष्टकरी, आणि गरीब विद्यर्थ्यांचा विचार जर केला, तर त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी मोबाइल (mobile) नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाइल मिळाला नसल्यामुळे नैराश्यातून (stress) दहावीतील एका विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कऱ्हाड (karhad) तालुक्यातील ओंडमध्ये घडली आहे.

सातारा : संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचे (corona virus) संकट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असता, शाळा आणि महाविद्यालये बंद (schools are closed)  ठेवण्यात आले आहेत. शैक्षणिक गोष्टी बंद असल्यामुळे मुलांना विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (electronic medium) ऑनलाईन शिक्षण (online education) दिले जात आहेत. परंतु काही शेतकरी, कष्टकरी, आणि गरीब विद्यर्थ्यांचा विचार जर केला, तर त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी मोबाइल (mobile) नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाइल मिळाला नसल्यामुळे नैराश्यातून (stress) दहावीतील एका विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कऱ्हाड (karhad) तालुक्यातील ओंडमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी आबासाहेब पोळ असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तसेच तिचे वयवर्ष १५ होते. साक्षी ही दहावीत शिक्षण घेत होती. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र, हालाखीच्या परिस्थितीमुळे साक्षीच्या आईला मोबाइल घेता आला नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी साक्षी मैत्रीणींच्या अथवा शेजाऱ्यांच्या घरी जात होती. परंतु काही दिवसानंतर ती वैतागली होती.

साक्षीने मोबाइलचा हट्ट केल्यानंतर आईला तिच्या शिक्षणाची गरज लक्षात येत होती. मात्र, पैसे आणि काम नसल्याने त्याही हतबल होत्या. दिवाळीपर्यंत पैसे साठवून मोबाइल घेऊ, असे त्यांनी सांगितले होते. तसेच ती लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. घरात आई, लहान भाऊ आणि साक्षी असे तिघेच वास्तव्यास असतात. आई मोलमजुरी करते. लॉकडाऊनमुळे रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने मोबाइल घेणे शक्य नसल्याचे आईने साक्षीला सांगितले होते. परंतु साक्षीने आपल्या शिक्षणासाठी मोबाइलचा हट्ट धरला होता. मात्र, त्यानंतरही मोबाइल न मिळाल्यामुळे साक्षीने अल्पवयातच टोकाचे पाऊल उचलले.