प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला वाठार स्टेशनच्या ग्रामसेवकाने दाखवली  केराची टोपली;आठवडा बाजार बंदचा आदेश असूनही भरविला बाजार

कोरेगाव तालुक्यातील आठवडी बाजार हे १२ मार्च पर्यंत बंद असताना देखील १२ मार्च रोजीचा वाठार स्टेशन येथील आठवडे बाजार हा मोठ्या स्वरूपात भरवण्यात आला यामध्ये प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी आदेश काढूनही १२ मार्चचा वाठार स्टेशन येथील आठवडे बाजार हा मोठ्या प्रमाणात भरल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण दिसून येत आहे. त्याचप्रमाणे वाठार स्टेशन ग्रामसेवकांनी प्रांताधिकारी यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्याचे चित्र आज वाठार स्टेशनमध्ये दिसत होते.

    भुईंज: महाराष्ट्र बरोबर सर्व देशात थैमान घालत असलेला कोरोना सर्वत्र सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यातील आठवडा बाजार पूर्णतः बंद केल्याचे चित्र दिसून येत आहे त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार हा १२मार्च पर्यंत बंद करण्याचा आदेश कोरेगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी काढला होता परंतु वाठार स्टेशनमध्ये मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळाले कोरेगाव तालुक्यातील आठवडी बाजार हे १२ मार्च पर्यंत बंद असताना देखील १२ मार्च रोजीचा वाठार स्टेशन येथील आठवडे बाजार हा मोठ्या स्वरूपात भरवण्यात आला यामध्ये प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी आदेश काढूनही १२ मार्चचा वाठार स्टेशन येथील आठवडे बाजार हा मोठ्या प्रमाणात भरल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण दिसून येत आहे. त्याचप्रमाणे वाठार स्टेशन ग्रामसेवकांनी प्रांताधिकारी यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्याचे चित्र आज वाठार स्टेशनमध्ये दिसत होते.

    उत्तर कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाठार स्टेशनमध्ये आठवडे बाजार म्हणलं की अफाट गर्दीचे स्वरूप दिसून येते यातच वाठार स्टेशन येथील ज्येष्ठ नेते भगवानराव घोंगडे यांच्या म्हणण्यानुसार जर बाजार भरवायचाच होता तर असा वेगळा आदेश काढण्याची काय गरज होती यातच वाठार स्टेशन ग्रामसेवकांवर वाठार स्टेशन ग्रामस्थांची विश्वासार्हता राहिलेली दिसून येत नाही असे भगवान घोंगडे म्हणाले तसं पाहिलं तर वाठार स्टेशन मध्ये पंचक्रोशीतील नागरिक आठवडा बाजारात माल विकण्यासाठी येत असतात परंतु काही व्यापार्यांना ग्रामसेवकांनी बसण्याची मुभा दिल्याने बाकीच्या व्यापाऱ्यांवर हा अन्याय झालेला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे कोरेगाव तालुक्याचे प्रांताधिकारी यांनी वाठार स्टेशन ग्रामसेवक यांच्यावर कठोर ती कारवाई करून निलंबनाचा आदेश काढावा असे घोंगडे पुढे म्हणाले एकाला तुपाशी आणि एकाला उपाशी असे चित्र आज वाठार स्टेशन आठवडे बाजारात दिसून आले त्याचप्रमाणे वाठार स्टेशन ग्रामसेवकांवर कठोर ती कठोर कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेणार आहोत असे भगवान घोंगडे म्हणाले.