शिक्षकांच्या प्रश्नांसाठी माण संघाचा पुढाकार ; सभापती, गटशिक्षणाधिकारी यांची घेतली भेट

माण तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक संघाने पुढाकार घेतला असून सेवापुस्तके ऑनलाइन करणे,३१मे २०२२ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची सेवापुस्तके पडताळणी करणे,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवणे,शाळांची लाइट बिले ग्रामपंचायतीने भरावीत, कोव्हीड -१९ अंतर्गत कामे यापुढे शिक्षकांना देऊ नये, हिंदी भाषा सूट,पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळावी अश्या अनेक मागण्या संघटनेच्या वतीने अध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी प्रभावीपणे मांडल्या.

    माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने अध्यक्ष व शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन महेंद्र अवघडे यांच्या नेतृत्वाखाली सभापती नितीन राजगे तसेच गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मेडेवार यांची शिक्षकांच्या समस्या सोडविण्याबाबत भेट घेतली.

    माण तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक संघाने पुढाकार घेतला असून सेवापुस्तके ऑनलाइन करणे,३१मे २०२२ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची सेवापुस्तके पडताळणी करणे,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवणे,शाळांची लाइट बिले ग्रामपंचायतीने भरावीत, कोव्हीड -१९ अंतर्गत कामे यापुढे शिक्षकांना देऊ नये, हिंदी भाषा सूट,पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळावी अश्या अनेक मागण्या संघटनेच्या वतीने अध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी प्रभावीपणे मांडल्या.या सर्व समस्या सोडविण्याची ग्वाही सभापती नितीन राजगे,गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी दिली.

    दरम्यान यावेळी नूतन विस्तार अधिकारी रमेश गंबरे,लिपिक युनूस यांची बदली झालेने त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रामभाऊ खाडे, प्रास्ताविक सुरज तुपे यांनी तर आभार राजाराम तोरणे यांनी मानले.यावेळी विस्तार अधिकारी सोनाली विभूते,पोपट जाधव,हणमंतराव अवघडे,सुभाष गोंजारी,महेश माने,अशोक गंबरे,अंकुश शिंदे,किशोर देवकर,बळीराम वीरकर, सुधाकर काटकर,अजित गलांडे,श्रीमंत खाडे इ. शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.