विषारी वायूच्या गळतीने साताऱ्यात खळबळ ; वाढेफाटा येथे टॅंकर पलटल्याने वायू गळती

बाटल्यांचा खच आणि धुरामुळे रस्ताला आग लागल्यासारखे स्वरूप दिसत होते. शेकडो बाटल्यातून अॅसिडचा धुर पसरत होता. सुमारे ३० मिनिटांनंतर ही आग आवाक्यात आणण्यात यश आले. त्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. दरम्यान कोणत्याही परवानगीशिवाय विषारी अॅसिडची वाहतूक करणाऱ्या उद्योजनाकांवर गुन्हा दाखल करण्याची उपस्थितांनी मागणी केली.

    सातारा : सातारा शहरानजीक महामार्गावर वाढे फाटा येथे तीव्र केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने रविवारी सायंकाळी एकच गोंधळ झाला . उग्र वासाच्या केमिकल गळतीमुळे महामार्गावर पिवळ्या धुराचे लोट दिसू लागल्याने वाहतूक यंत्रणेची मोठी धावपळ उडाली . खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती .

    साताऱ्यात झालेल्या कॉन्स्टेंट अॅसिडच्या भयंकर गॅस गळतीने एकच दाणादाण उडाली. महामार्गावर सातारा MIDCच्या दिशेने जाणाऱ्या एका टॅम्पोमध्ये कॉन्स्टेंट अॅसिडच्या बाटल्या होत्या. या वाहनाचा अपघात झाल्याने यातील विषारी बाटल्या फुटल्या. या बाटल्या फुटल्याने पिवळा धमक धुर आसमंतात पसरला होता. यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती तर वाहनधारक्यांच्या डोळ्यांना प्रचंड त्रास जाणवला.

    काय घडले हे कळत नसल्याने वाहनधारक्यांनी गाड्या मागे वळवल्या. त्यामुळे आमने सामने येणाऱ्या गाड्यांचे छोटे मोठे अपघात घडले. या घटनेमुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अनेकांना या विषारी धुराचा त्रास झाला. काही महिलांना तर रस्तावरच उलट्या झाल्या. पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. हा विषारी टँकर बाजूला करताना तारांबळा उडाली. घटनास्थळी पोहचताच पोलिसांच्याही नाक, घसा तसेच डोळ्यांना त्रास सुरु झाला.

    बाटल्यांचा खच आणि धुरामुळे रस्ताला आग लागल्यासारखे स्वरूप दिसत होते. शेकडो बाटल्यातून अॅसिडचा धुर पसरत होता. सुमारे ३० मिनिटांनंतर ही आग आवाक्यात आणण्यात यश आले. त्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. दरम्यान कोणत्याही परवानगीशिवाय विषारी अॅसिडची वाहतूक करणाऱ्या उद्योजनाकांवर गुन्हा दाखल करण्याची उपस्थितांनी मागणी केली. बाटल्यांचा खच आणि धुरामुळे रस्ताला आग लागल्यासारखे स्वरूप दिसत होते.