accident

मिनी बसने गोव्याला फिरायला जात असताना महामार्गावरुन बस नदीच्या कठड्यावरुन खोल दरीत कोसळली. ४० फुट खोल दरीत बस कोसळून ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सातारा : साताऱ्यामध्ये पुणे-बंगळुरू महामार्गावर ऐन दिवाळीत भीषण अपघात (Accident) झाला आहे. त्यामुळे सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या महामार्गावर गोव्याला फिरायला जाणाऱ्या ६ जणांवर काळाने घाला घातला आहे. महामार्गावरील उब्रंज येथील तारळी नदीजवळ अपघात झाला. (minibus crashed into a 40-foot-deep ravine) भरधाव बस नदीचा कठडा ओलाडून खाली कोसळल्याने भीषण अपघात झाला.

मिनी बसने गोव्याला फिरायला जात असताना महामार्गावरुन बस नदीच्या कठड्यावरुन खोल दरीत कोसळली. ४० फुट खोल दरीत बस कोसळून ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहचली आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामध्ये मृतांची संख्या ६ वर गेली आहे. तसेच या मृतांमध्ये ३ वर्षीय बालकाचा समावेश आहे. मिनी बस पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास खोल दरीत कोसळली. स्थानिक नागरिकांच्या माहितीमुळे आणि मदतीमुळे जखमींना लवकरात लवकर उपचार मिळाला आहे.