मालशे पुलाचा भूखंड अखेर बिल्डरच्या घशात; पुलाच्या विकसनाची सेटलमेंट सातारकरांच्या मुळावर

  सातारा : यादोगोपाळ पेठ व शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या मालशे पुलालगत विकसनसाठी आरक्षित करण्यात आलेली जमीन पद्धतशीरपणे बिल्डरने घशात घातल्याचे स्पष्ट झाले. या जागेला कुंपण घालण्यात आले असून, येथील पुरातन वृक्षांचाही सफाया केली जाण्याची भित आहे.

  सर्व्हे नं ७३ येथील यादोगोपाळ पेठेत असणाऱ्या मालशे पुलाचे रुंदीकरण, बस स्टॉप तसेच महिलांसाठी शौचालय अशा विविध कारणासाठी या जागेचे विकसन करण्याचा ठराव ७ ऑगस्ट २०१८ च्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. या ठरावाचे सूचक नगरसेवक धनंजय जांभळे व अनुमोदक यशोधन नारकर होते. या ओढ्याच्या रुंदीकरणासाठी पात्रात मोठ्या पाईपचे अतिक्रमण करण्यात येऊन पालिकेच्या वतीने तब्बल ५१ लाखांची संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. या जागेतील पुरातन वडाचे झाड तोडण्याची वृक्ष विभागाला परवानगी मागण्यात आली होती.

  बिल्डरच्या सोयीसाठी काही पण?

  मोक्याच्या जागा हेरून त्याचा होलसेल धंदा करण्याची काही धेंडांचा नस्ता उद्योग शहर विकसनाच्या मुळावर आला आहे . पुलाच्या रुंदीकरणासाठी विकसित करण्यात आलेली जागा बिल्डरने कंपाउंड मारून बंदिस्त केल्याने सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे. एका पाहणीच्या निमित्ताने पुलावर गेलेल्या पालिकेच्या एका अधिकाऱ्याला एका भाऊ नगरसेवकाने त्याला तेथून पिटाळून लावल्याची चर्चा आहे. पालिकेची तब्बल दोन ते अडीच गुंठे जागा बिल्डरने परस्पर घशात घातल्याने स्थावर जिंदगी विभाग झोपा काढतो काय ? हा प्रश्न निर्माण होत आहे.

  दृष्टीक्षेपात काही मुद्दे…

  १ . अदालत वाड्यानजीकचा ओढ्याला सव्वाशे वर्षांची परंपरा
  २ . राजकीय हस्तक्षेपात बदलले ओढ्याचे मूळ पात्र
  ३ . ओढ्यातील पुरातन वृक्षसंपदेला धोका