बिबट्याच्या दर्शनाने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण ; तांबवे येथील घटना

तांबवेत आठवड्यात चारवेळा बिबट्यांचे दर्शन झाले असून परिसरात चार बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मागील आठवड्यात तीन ठिकाणी शेतकर्‍यांना बिबट्यांचे दर्शन झाले आहे. एका बिबट्याने सलग दोन दिवसात एकाच शेतकर्‍याच्या दोन शेळ्या ठार केल्या आहेत. याच दरम्यान शेळी मालकावरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, यामध्ये शेतकरी सुदैवाने बचावला असून शेतकर्‍याच्या हाताला बिबट्याच्या पंजाचा तडाखा बसल्याने हाताला जखम झाली आहे.

    कराड : तांबवे, ता. कराड गावातील शिवारात सोमवारी दुपारी शेतकऱ्यांना बिबट्याचा मुक्त वावर पाहायला मिळाला. जनावरांच्या शेडमधून डोकावून पाहत असताना शेतकर्‍याला बिबट्या दिसला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.

    याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तांबवेतील आप्पासो पाटील हे शेतकरी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जनावरांच्या शेडमध्ये होते. यानंतर काही वेळाने याच शेडच्या जवळच बिबट्या डोकावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. त्‍यांच्‍या आवाजाने बिबट्याने शेडाच्या पाठीमागील उसाच्या शेतात धूम ठोकली. दरम्यान, आप्पासो पाटील यांनी मोबाईल कॅमेर्‍यात बिबट्याचे चित्रीकरण केले आहे.

    तांबवेत आठवड्यात चारवेळा बिबट्यांचे दर्शन झाले असून परिसरात चार बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मागील आठवड्यात तीन ठिकाणी शेतकर्‍यांना बिबट्यांचे दर्शन झाले आहे. एका बिबट्याने सलग दोन दिवसात एकाच शेतकर्‍याच्या दोन शेळ्या ठार केल्या आहेत. याच दरम्यान शेळी मालकावरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, यामध्ये शेतकरी सुदैवाने बचावला असून शेतकर्‍याच्या हाताला बिबट्याच्या पंजाचा तडाखा बसल्याने हाताला जखम झाली आहे.

    नर-मादी बिबट्यांची जोडी आणि आणखी दोन बछाडे असे चार बिबटे तांबवे गावातील शिवारात फिरताना दिसत आहेत. यामुळे तांबवेसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.