जबरी चोरी करणारे तिघे २४ तासांत जेरबंद ; बोरगाव पोलिसांची कामगिरी

बोरगाव पोलिसांनी जलद तपास करत तांत्रीक बाबीचा अभ्यास करुन गुन्हेगारांच्या माग काढला. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकलीची माहिती मिळताच तिघांनाही ताब्यात घेतले. चौकशी करताच आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व जबरीने चोरलेली ४० हजार ८०० रोख रक्कम व टॅब असे एकुण ४५ हजार ८०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

    सातारा : माजगाव, ता. गावच्या हद्दीत फायनान्स कंपनीच्या कर्मचार्यास अडवून दांडक्याने मारहाण करून रोख रक्कम आणि टॅब जबरीने चोरून तिघेजण पसार झाले होते. याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत २४ तासांत तीन जणांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी बोरगाव पोलिसांनी हस्तगत केली आहे.

    याबाबत माहिती अशी, गणेश वैजनाथ राख (वय २२, रा. उंब्रज ता. कराड) हे मायक्रो फायनान्स कंपनीत उंब्रज शाखेत नोकरी करतात. या कंपनीने महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाचे हप्ते फायनान्स गोळा करण्यासाठी ते नेहमीप्रमाणे अंधारवाडी, खराडे, माजगाव येथे गेले. हप्ते गोळा करुन परत उंब्रजला जात असताना दुपारी १२ च्या सुमारास माजगाव येथे कमानीच्या अलिकडे रस्त्यामध्ये अज्ञात तीन इसमांनी गणेश वैजनाथ राख यांची मोटारसायकल जबरदस्तीने थांबवून त्यांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यानंतर त्यांनी राख यांच्याकडील काळ्या रंगाची बॅग हिसकावून चोरटे शेजारील उसाच्या शेतातून पसार झाले. या बॅगमध्ये गोळा केलेले ४६ हजार ५३७ रुपये रोख व ५ हजारांचा सॅमसंग कंपनीचा टॅब असा एकुण ५१ हजार ५७३ चा मुद्देमाल चोरीस गेला.

    याची फिर्याद दाखल होताच बोरगाव पोलिसांनी जलद तपास करत तांत्रीक बाबीचा अभ्यास करुन गुन्हेगारांच्या माग काढला. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकलीची माहिती मिळताच तिघांनाही ताब्यात घेतले. चौकशी करताच आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व जबरीने चोरलेली ४० हजार ८०० रोख रक्कम व टॅब असे एकुण ४५ हजार ८०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

    गुन्हा दाखल होेताच बोरगाव पोलिसांनी अवघ्या २४ तातसात जबरी चोरीसारखा गंभीर गुन्ह्याचा छडा लावत तिघा आरोनींना जेरबंद केले. ही कारवाई पोलीसअधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ, महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन महाडीक, किरण निकम, विजय सांळुखे, विशाल जाधव, प्रकाश वाघ, राहुल भोये, कपिल टिकोळे, अमित पवार, उत्तम गायकवाड यांनी केली आहे. तसेच सायबर सेल सातारा यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे.