तीनशे वर्षांची परंपरा असलेलं भेंडवळ भाकित खरे ठरले; पावसाचे भकित

तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भविष्यही यानिमित्ताने खरे ठरले आहे. घटमांडणीच्या भाकितानुसार पर्जन्यमान कमी सांगितले असून जून महिन्यात कमी पाऊस येईल. सार्वत्रिक पाऊस होणार नाही. जुलै महिन्यात सार्वत्रिक आणि चांगला पाऊस पडेल असे म्हटले होते. ऑगस्ट महिन्यामध्ये जून-जुलै पेक्षा कमी पाऊस पडेल. आणि सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी पावसाचे भाकित वर्तविले होते.

    सातारा : तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भविष्यही यानिमित्ताने खरे ठरले आहे. घटमांडणीच्या भाकितानुसार पर्जन्यमान कमी सांगितले असून जून महिन्यात कमी पाऊस येईल. सार्वत्रिक पाऊस होणार नाही. जुलै महिन्यात सार्वत्रिक आणि चांगला पाऊस पडेल असे म्हटले होते. ऑगस्ट महिन्यामध्ये जून-जुलै पेक्षा कमी पाऊस पडेल. आणि सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी पावसाचे भाकित वर्तविले होते.

    शेतकरी आनंदित

    भारतातील मान्सूनबाबत हवामान खात्यासह स्कायमेटही नेहमीच अंदाज वर्तवित असतो. भारतात अनेक ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीला पेरणीला सुरुवात केली जाते. यावर्षी जर मान्सुन पूर्व काळात चांगला पाऊस पडला तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचे शेत तयार करण्यासाठीही चांगली मदत होईल. जर हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या आनंदाबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील याचा फायदा होणार आहे.

    कराडमध्ये पावसाचा राडा

    मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली असून विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही मंगळवारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. कराड येथे ठिकठिकाणी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याचेही दृश्य होते. अनेक जणांची महत्त्वाच्या वस्तू वाचविण्याचीही लगबग दिसून आली.