बहिरोबा दूध संस्थेचे कार्य आदर्शवत : ॲड. उदयसिंह पाटील

  कराड : बहिरोबा दूध संस्था १९६७ साली स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेने सभासदांना विविध सुविधा देऊन आदर्शवत असे कार्य संस्थेने केले असल्याचे प्रतिपादन रयत साखर कारखान्याचे चेअरमन व जि. प. सदस्य ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले.

  बहिरोबा दुध उत्पादक संस्था आरेवाडी या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ॲड. पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आली. यावेळी कोयना दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे उपाध्यक्ष बाबुराव धोकटे, जि. प. सदस्य प्रदीप पाटील, हणमंतराव चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

  उदयसिह पाटील-उंडाळकर म्हणाले, आजमितीला बहिरोबा संस्थेकडे १८ लाख रुपयांचा ठेवी आहेत. दररोज दूध संकलन ४०० लिटर केली जात आहे. संस्था दिवाळीला प्रति लिटर २ ते ३ रुपये बोनस देत असून गावातील मयत सभासदांच्या अंत्यविधीसाठी तीन हजार रुपये दिले जातात, हा एक नवीन आदर्श या संस्थेने निर्माण केलेला आहे. तसेच माझा या संस्थेने व ग्रामस्थांनी सत्कार केला याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

  कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन दिलीप देसाई, व्हा. चेअरमन, सभासद, संचालक मंडळ उपस्थित होते. आभार लक्ष्मण देसाई यांनी मानले.

  आरेवाडीवर नेहमीच काकांचे प्रेम राहिले

  आरेवाडी गावावर नेहमीच विलासकाकांचे प्रेम राहिलेले आहे, ते कसे वृद्धिंगत होईल यासाठी मी इथून पुढे प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी दिली.