arrest

सातारा : सातारा तालुक्यातील एका गावात बुधवारी  (दि.5) दुपारी मूकबधिर वृद्ध महिला झोपली असतानाच एका युवकाने अत्याचार केला. या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ संशयित युवकास शिताफीने अटक केली. सूरज दत्तात्रेय पवार (वय.३०,रा.मांडवे,ता.सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

सातारा : सातारा तालुक्यातील एका गावात बुधवारी  (दि.५) दुपारी मूकबधिर वृद्ध महिला झोपली असतानाच एका युवकाने अत्याचार केला. या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ संशयित युवकास शिताफीने अटक केली. सूरज दत्तात्रेय पवार (वय.३०,रा.मांडवे,ता.सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत नागठाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, नागठाणे परिसरातील डोंगरपायथ्याशी वसलेल्या एका गावातील  मूकबधिर वृध्द महिलेवर अत्याचार करण्यात आला होता. त्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना दुसऱ्या दिवशी मिळाली.तपासाच्या दृष्टीने तपास अधिकारी व  पोलिसांनी तात्काळ मूकबधिर व्यक्तींची भाषा जाणणाऱ्या एका शिक्षिकेला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. ही पीडित मूकबधिर वृद्ध महिला भाऊ व आईसोबत राहते. बुधवारी दुपारी ही महिला तिच्या घरातील पडवीत झोपली असता आरोपी सूरज पवार याने महिलेवर अमानुषपणे अत्याचार केला अशी माहिती या पीडित वृद्धेने हाताच्या खुणेने दिली. घटना घडत असताना वृद्धेने आरडाओरडा केला असता शेजारील महिला मदतीसाठी धावत आल्याचे पाहून संशयिताने तेथून पलायन केले.

या घटनेची फिर्याद काल, गुरुवारी रात्री बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून रात्री उशिरा पोलिसांनी संशयित सूरज पवार याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आंचल दलाल करत आहेत.मूकबधिर महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला चौवीस तासात अटक करून आरोपीला बेड्या ठोकल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.