…तर निसर्गाचा समतोल राखणे शक्य : उदयनराजे भोसले

    सातारा : देश सातत्याने प्रगती करत असताना पर्यावरणांचे संवर्धन होणेही आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. नागरिकांनी सतर्कता राखल्यास निसर्गाचा समतोल राखणे शक्य आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खासदार भोसले यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, “आपला भारत देश विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. मात्र, असे असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो, हे आपण त्सुनामी, नरगीससारखी सागरी वादळे, भूकंप, ढगफूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवले आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरणाचा समतोल राखल्यास आपण खर्‍या अर्थानं समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    जगभरात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे. त्यामुळे सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरणाची विशेष काळजी घेतल्यास, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास नक्कीच थांबेल. तसेच आपल्या परिसरात झाडे देखील लावणे गरजेचे आहे, जेणेकरुन आपल्याला चांगला ऑक्सिजन मिळेल.

    दरम्यान, आपला देश प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणविषयक सजग राहिल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकू आणि खऱ्या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु, असेही ते म्हणाले.