तेव्हा निर्बंध झुगारले आणि आता कोरोनाने गाठले! बावधनकरांना बगाड यात्रा आली अंगलट; गावातील तब्बल ६१ जण कोरोनाबाधित

राज्यातील सर्वात मोठे बगाड पाहण्यासाठी येथे दरवर्षी लाखो भाविक हजेरी करत असतात चालू वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जमावबंदी जाहीर केली होती. परंतु काही लोकांनी जमावबंदी झुगारून यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने १०० हून अधिक लोकांच्यावर गुन्हे दाखल केले.

    सातारा: राज्यभर कोरोनाचे संक्रमण वेगाने सुरू आहे. दररोज हजारो नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. कोरोनाने केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही थैमान घालायला सुरुवात केली आहे. शहरात प्रशासनाने घातलेले प्रतिबंधक नियमांचे पालन काही प्रमाणात नागरिक करताना दिसतात मात्र खेडेगावात अजूनही कोरोनाबाबत निष्काळजी बघायला मिळत आहे. अशाच प्रकार सातारा जिल्ह्यातील बावधन येथे घडला आहे. येथे प्रशासनाचे आदेश झुगारून मोठी गर्दी करून सुप्रसिद्ध बगाड यात्रा साजरी करण्यात आली होती. यात्रेनिमित्त गर्दी जमवून प्रशासनाचे आदेश झुगारणे बावधनकरांना चांगलेच महागात पडू लागले आहे. बगाड यात्रेनंतर तब्बल ६१ जण कोरणा बाधित आढळून आले आहेत

    राज्यातील सर्वात मोठे बगाड पाहण्यासाठी येथे दरवर्षी लाखो भाविक हजेरी करत असतात चालू वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जमावबंदी जाहीर केली होती. परंतु काही लोकांनी जमावबंदी झुगारून यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने १०० हून अधिक लोकांच्यावर गुन्हे दाखल केले. परंतु प्रशासनाचे आदेश झुगारून यात्रा करणे, बावधन येथील लोकांना आता महागात पडू लागले आहे. कारण येथे कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे.बावधन येथील बगाड यात्रेनंतर जमलेल्या गर्दीचा परिणाम आता गावातील लोक कोरोनाबाधित होत असल्याचे दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनाचा आदेश झुगारणे बावधनकरांच्या अंगलट येऊ लागले आहे