ज्यांच्यात धमक आहे, त्यांनी साखर कारखाने चालवून दाखवावेत : अजित पवार

उदयनराजे यांनी सातारा दौऱ्याबद्दल केलेल्या टिकेला उत्तर देताना  अजित पवार म्हणाले मला या गोष्टींबद्दल काहीही बोलायचं नाही. असल्या प्रश्नांना उत्तर पण द्यायचं नाही. मी नियमांप्रमाणे वागणारा माणूस आहे. जे नियमांप्रमाणे आहे ते होईल. मला विकासाशिवाय काहीही बोलायचे नाही. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे.

  खटाव : आज किसनवीर कारखान्याची काय अवस्था आहे ? ते पण वरुन म्हणत असतील कि कशाला माझं नाव दिलं आणि कारखान्याची वाट लावली. अरे जेव्हा मोठ्या लोकांची नावे संस्थांना देता तेव्हा त्यांच्या नावाला साजेसे काम तुम्हाला करता आले पाहिजे. नाव अगदी मोठे प्रतापगड आहे पण त्याही कारखान्याची काय अवस्था झालीय? ज्यांच्यात धमक आहे त्यांनी कारखाने घेऊन चालवून दाखवावेत. विनाकारण काम करणाऱ्यांची बदनामी करत बसू नका असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटाव येथे बोलताना लगावला.

  खटाव येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रभाकर देशमुख, सुनील माने, मानसिंग जगदाळे, इंदिराताई घार्गे, तेजस शिंदे, नगराध्यक्ष सुनील गोडसे, सभापती जयश्री कदम, सुनिता कचरे, सुरेंद्र गुदगे, प्रा. अर्जुन खाडे, बाळासाहेब सोळस्कर, मंगेश धुमाळ, कल्पना खाडे,बाळासाहेब जाधव, जितेंद्र पवार, सागर साळुंखे, राष्ट्रवादी आणि पिंपळेश्वर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  अजित पवार पुढे म्हणाले की, एखादया निवडणूकीत जनतेने एकदा निवडून दिले तर काम करावे लागते तेव्हा जनता दुसऱ्यादा निवडून देते. कोरोनो काळात आम्ही विकासकामे थांबली तरी चालतील पण माणसांचा जीव वाचला पाहिजे, अशी भूमिका घेत पहिल्या व दुसऱ्या लाटेविरुद्ध लढलो. गरजेच्या सर्व खबरदाऱ्या घेतल्या. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे खटावच्या वैभवात भर पडली असून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्यवत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून त्यांना चांगला स्टाफ मिळावा याकडे देखील लक्ष्य देत आहोत. यापुढच्या काळात सातारच्या नागरिकांना उपचारासाठी मुंबई पुणे आदी ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही साठी प्रयत्न करणार आहोत. जिहे कटापूर योजनेला मान्यता ही आमच्याच काळात मिळाली असून अंतिम टप्यातील काम देखील आमच्याच काळात पूर्ण होत आहे. दिवाळीपूर्वी राज्यातील रस्त्यावरील सर्व खड्डे मुजवून घेण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.जिल्हा बँकेला राज्यातील चांगली बँक म्हणून पाहिले जाते. जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी अनेक जण इच्छुक असून शेवटी मतदार ज्यांच्या पाठीशी आहेत त्यांना संधी मिळेल. बँक चांगली चालवण्यासाठी बँक ही चांगल्या लोकांच्या हाती राहिली पाहिजे. येणाऱ्या काळात नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचयात समिती या निवडणुकीत लोकांच्या मध्ये राहून चांगले काम करणाऱ्याला उमेदवारी दिली जाईल असे अजित पवार म्हणाले.

  खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, सातारा जिल्हा हा परंपरा असणारा जिल्हा असून राष्ट्रवादीच्या स्थापने पासून सातारा जिल्हा हा शरद पवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे.आणि यापुढेही झाले गेले विसरून उभे राहावे. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्राचे महत्त्व दीड वर्षत लक्ष्यात आले असून कोरोनो काळात सर्वसामान्यना दिलासा देण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रनी केले आहे.अजित पवारांचे सातारा जिल्ह्यावर कायम प्रेम राहिले असून जिल्हाला न्याय दिला आहे.

  विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर शरद पवार, अजित पवार यांना खूप दुःख झाले त्यांनी ते जाहिरपणे बोलून पण दाखवले. माझा पराभव का झाला यावर मी बोलणार नाही माझ्या कडून कोणतीही चूक होणार नाही. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्तावर अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्यामध्ये शिवसेना सहभागी असल्याने कोरेगाव चे लोकप्रतिनिधी शिवसेनेचे आहेत त्यामुळे बंधने आहेत.

  प्रदीप विधाते म्हणाले की, खटाव वासियांवर अजित दादांचे कायम प्रेम राहीले असून जेव्हा जेव्हा ते खटावला आले तेव्हा त्यांनी खटावकराना भरीव निधी दिला. विशेष बाब म्हणून खटाव ला 2 कोटींचा निधी अजित पवारांनी दिला होता.

  उदयनराजे यांनी सातारा दौऱ्याबद्दल केलेल्या टिकेला उत्तर देताना  अजित पवार म्हणाले मला या गोष्टींबद्दल काहीही बोलायचं नाही. असल्या प्रश्नांना उत्तर पण द्यायचं नाही. मी नियमांप्रमाणे वागणारा माणूस आहे. जे नियमांप्रमाणे आहे ते होईल. मला विकासाशिवाय काहीही बोलायचे नाही. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे.

  सहकार चळवळ टिकवायची असेल तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात साखर कारखाने दिले पाहिजेत. मागील काळात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक या महान व्यक्तींसह योग्य लोकांच्या हातात गोष्टी राहायच्या त्यामुळे सहकार क्षेत्राला गती मिळाली. आणि कृषी क्षेत्रासह शेतकऱ्यांचा फायदा झाला. नंतरच्या काळात सहकारात नको ते राजकारण शिरले. व्यापारी दृष्टिकोनातून कारखाने चालवायला हवेत. आर्थिक शिस्त लावायला हवी. मात्र सध्या नेमक्या याच गोष्टींना हरताळ फासला जातोय.

  जिल्हा बॅंकेबाबत जिल्ह्याचे नेते निर्णय घेतील …..
  लोकसभा, विधानसभा निवडणूकांचे निर्णय आम्ही राज्यपातळीवर घेतो. सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीचा निर्णय रामराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिदे, मकरंद पाटील एकत्र बसून घेतील असे दादांनी सांगितले.