जिवंत काडतुसासह विनापरवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक

फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून भारतीय हत्यार अधिनियम ३,२५ भा द वि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास एन.आर.गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत . आरोपी यांना मा न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने दिनांक२४ मे रोजी पर्यत ५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे

    फलटण : फलटण शहरामध्ये दि .२० रोजी मध्यरात्री भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत राजु राम बोके हा त्याचे दोन साथीदारांसह एका मित्राला भेटायला येणार असून त्याच्या जवळ बेकायदेशीर पिस्टल आहे . त्यानुसार तात्काळ दोन पंचाना बोलावून त्यांच्यासह , एस.के.राऊळ सहाय्यक पोलीस निरीक्षक , अमोल कदम पोलीस उपनिरीक्षक , एस.एन.भोईटे सहाय्यक फौजदार.बी.पी.ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल ,एम.डी.सुळ पोलीस नाईक , एस.ए.तांबे पो ना ,एन.डी.चतुरे पोलीस नाईक , बी.एच लावंड पोलीस नाईक , ए.एस.जगताप पोलीस शिपाई , डि पी सांडगे पो कॉ असे सर्वजण मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा लावला असता रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास एका मोटार सायकलवर तिघेजण येताना दिसले त्यांना जागीच पकडून पो नि भारत किंद्रे यांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे राजू राम बोके (वय ३४ रा मंगळवार पेठ फलटण) ,दिलीप तुकाराम खुडे वय ३२ वर्षे (रा लक्ष्मीनगर फलटण)व मनोज राजेंद्र तिप्परकर (वय २७ वर्षे रा प्रेमलाताई हायस्कुल जवळ मलठण) त्यांच्या अंगाची झडती घेतली असता राजू राम बोके यांचे कमरेस एक पिस्टल खोवलेली दिसून आली त्यांची मॅगझीन काढून पाहीली असता त्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले

    त्याबाबत त्यांचे विचारणा केली असता त्यांचेकडे कोणत्याही प्रकारे परवाना नसल्याबाबत सांगितले. त्यांनतर त्यास ताब्यात घेवून त्याचे पिस्टल , मोटार सायकल , तीन मोबाईल , तपास जप्त करण्यात आलेले आहेत . त्याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून भारतीय हत्यार अधिनियम ३,२५ भा द वि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास एन.आर.गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत . आरोपी यांना मा न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने दिनांक२४ मे रोजी पर्यत ५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे