hunting

धाड टाकताच मांस खरेदीसाठी आलेले लोक तेथून पळून गेले. मांस खरेदीसाठी ३५ हून अधिक लोकांनी गर्दी केल्याची माहिती मिळत आहे. यामधील ९ खरेदीदारांची वाहने जप्त कऱण्यात आले आहेत. तसेच कारवाईत रानडुकराचे ५५ किलो मांस आणि तराजू, चाकू जप्त करण्यात आले आहे.

कराड : कराडमध्ये ४ रानडुकरांची शिकार करुन तीघेजण डुकराच्या मांसची विक्री करत होते. वनविभागाच्या ( Forest Department) चमूने धडक कारवाई करत या मांस विकणाऱ्या ३ आरोपींना अटक (Three arrested for hunting wild boar) आणि मांस खरेदी करण्यासाठी आलेल्यांच्या एकूण ९ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. कराडमधील हजारमाची वनविभागाच्या चमून ही कारवाई केली होती. दरम्यान एका आरोपीने पलायन केले आहे.

चार रानडुकरांची शिकार झाल्याची माहिती वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे रोहन भाटे यांना मिळाली होती. या रानडुकरांचे मांस विक्रीसाठी येणार असल्याचे माहिती भाटे यांनी वन्यजीव जिल्हाप्रमुख भारतसिंह हाडा यांना दिली होती. विनविभागाच्या एका चमूने हजारमाची येथे धाड टाकली. धाड टाकताच मांस खरेदीसाठी आलेले लोक तेथून पळून गेले. मांस खरेदीसाठी ३५ हून अधिक लोकांनी गर्दी केल्याची माहिती मिळत आहे. यामधील ९ खरेदीदारांची वाहने जप्त कऱण्यात आले आहेत. तसेच कारवाईत रानडुकराचे ५५ किलो मांस आणि तराजू, चाकू जप्त करण्यात आले आहे.

वन विभागाने केलेल्या कारवाईत वन्यजीव अपराध नियंत्रणचे सदस्य तथा मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, सहायक वनसंरक्षक अमरजित पवार, वनक्षेत्रपाल ए. बी. गंबरे, वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक अरुण सोळंकी यांचा समावेश होता.