बहिणीस त्रास देत असल्याने एकाचा खून करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी साताऱ्यात तिघांना अटक

सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेमधील मृतदेह आज आढळून आला होता. प्रथमदर्शनी कोणत्यातरी अज्ञात इसमाचा खून करुन त्याचा मृतदेह जाळून पुरावा नाहीसा केल्याचे निदर्शनास आले होते.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आदींनी घटनास्थळी भेट दिली होती.

    सातारा : बहिणीस त्रास देत असल्याने एकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्या बद्दल तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे, तेजस नंदकुमार आवळे ,संग्राम बाबू रणपिसे अशी त्यांची नावे आहेत.

    सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेमधील मृतदेह आज आढळून आला होता. प्रथमदर्शनी कोणत्यातरी अज्ञात इसमाचा खून करुन त्याचा मृतदेह जाळून पुरावा नाहीसा केल्याचे निदर्शनास आले होते.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आदींनी घटनास्थळी भेट दिली होती.

    परिसरात या बाबत केलेल्या पोलीस चौकशीत हा मृतदेह आकाश राजेंद्र शिवदास, (रामनगर, ता.सातारा) याचा असल्याचे निष्पन्न झाले. आकाश उर्फ रॉजर शिवदास हा विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे याचे बहिणीस त्रास देत होता.या कारणावरुन चिडुन जावुन त्यास मध्यरात्री खंडोबाचा माळ येथे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन करुन त्याचा मृतदेह जाळून टाकला असल्याचे सांगीतले.याप्रकरणी पोलिसांनी विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे (वय १९ ) तेजस नंदकुमार आवळे (वय १९) संग्राम बाबू रणपिसे (वय २८, सर्व जण रविवार पेठ सातारा)यांना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अपर अधीक्षक धीरज पाटील, सहायक अधीक्षक आँचल दलाल उपस्थित होते.

    गुन्हयाचे तपासात जळालेला मृतदेह पुरुष की स्त्री याबाबत खात्री होत नसताना व कोणताही पुरावा नसताना अत्यंत कमी वेळत मृतदेहाची ओळख पटवुन संशयीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास कौशल्याचा वापर करुन विचारपुस करुन सदरचा क्लिष्ट गुन्हा तीन तासात उघडकीस आणल्याचे बन्सल यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, उपनिरीक्षक मदन फाळके व सहकाऱ्यांनी याकामी तपास केल्याचे त्यांनी सांगितले.