वाई, पाचगणी व महाबळेश्वरच्या व्यापाऱ्यांची टाळेबंदीत शिथिलतेची व व्यवसाय सुरु करण्याची मागणी

मागील दोन महिन्यांपासून येथील व्यापार पेठ हॉटेल बंद आहेत.मागील वर्षभरात करोना प्रदुर्भावाने सात ते आठ महिने व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक अडचणी वाढलेल्या आहेत. दुकानदार व्यापारी हॉटेल व्यवसायिक व त्यांच्यावर अवलंबून असणारे सर्वांचेच दैनंदिन जीवनात हाल सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी संचारबंदी व त्यानंतर टाळेबंदी करण्यात आली तेव्हापासून सर्व बाजारपेठ बंद आहे.

    ओझर्डे :  महाबळेश्वर व पाचगणी वाई येथे कडक टाळेबंदीत शिथिलता देण्याची मागणी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

    मागील दोन महिन्यांपासून येथील व्यापार पेठ हॉटेल बंद आहेत.मागील वर्षभरात करोना प्रदुर्भावाने सात ते आठ महिने व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक अडचणी वाढलेल्या आहेत. दुकानदार व्यापारी हॉटेल व्यवसायिक व त्यांच्यावर अवलंबून असणारे सर्वांचेच दैनंदिन जीवनात हाल सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी संचारबंदी व त्यानंतर टाळेबंदी करण्यात आली तेव्हापासून सर्व बाजारपेठ बंद आहे. महाबळेश्वर पाचगणी वाई येथील अनेक व्यापाऱ्यांनी लसीकरण केलेले आहे. येथील रुग्णांची संख्याही कमी झालेली आहे. त्यामुळे या परिसरातील व्यापार व्यवसाय सुरू करावेत अशी मागणी व्यापाऱ्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे केली.आपण प्रशासनाशी संपर्क साधून टाळेबंदी मध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी केली आहे तशी सूचना पालिका मुख्याधिकाऱ्यांना द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे.