व्यापारी म्हणताहेत, ‘निर्बंध पाळतो, लॉकडाऊन नको’

  वाई : प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. टाळेबंदीशिवाय पर्याय नसल्याची प्रशासनाची भूमिका आहे. तर निर्बंध पाळतो, पण “लॉकडाऊन’ नको, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एका बाजूला प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर दुसरीकडे व्यापारी कात्रीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. सलग दुसऱ्या वर्षी तिसऱ्यांदा होत असलेल्या “’लॉकडाऊन’मुळे जनता अडचणीत सापडली आहे.

  ‘हे’ चालू,’ते’बंदचा खेळ पुन्हा सुरू झाला असून या परिस्थितीत व्यापारी, व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होतं आहे. वाई शहरात, पालिका प्रशासन, पोलिसांकडून निर्बंधाची कड़क अंमलबजावणी केली जातं आहे. या टोळबंदीविरोधात सर्वसामान्यांतून तीव्र ‘ प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याबरोबरच व्यापारी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. बाजारपेठेवर निर्बंध घाला. वेळेची मर्यादा ठेवा. मात्र संपूर्ण टाळेबंदी मागे घ्या, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

  गुरुवारी सकाळी दहा ते आकरा व्यापारी महासंघाची अभिनव अशी लक्षवेधी साखळी आंदोलन झाले. प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानाच्या बाहेर व्यापारी महासंघाने दिलेल्या पत्रक हातात धरून आपली मागणी शासनाकडे मागुन प्रशासनाचे लक्षवेधण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रांत यांना निवेदन देण्यात आले, निवेदनात म्हंटले आहे की गेली अनेक महिने सर्व व्यापाऱ्यांचे व्यापार बंद आहेत आमच्या दुकानावर असेलेले सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय त्यांच्या उपजीविकेचे मार्ग बंद झालेले आहेत. त्यामुळे शहरातील व्यापारी बाजारपेठ मोडकळीस आली आहे साद्य परिस्थिती सर्व प्रकारचे कर कामगारांचे पगार विज बिल तसेच बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते देणे सुद्धा अत्यंत जिकरीचे झाले आहे. शासनाकडुन कोणत्याही प्रकारच्या कर सवलती मिळालेल्या नाहीत.

  मुख्याधिकारी वाई यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनेनुसार आम्ही वाईतील व्यापाऱ्यांनी पालिकेने कोरोना टेस्ट केल्या असून त्याच्या सर्व तपासण्या ची नोंद नगर परिषदेकडे उपलब्ध आहे यामध्ये बहुतांश कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे, असे निर्बंध चालू राहिले. व्यापाऱ्यांना जगणे सुद्धा होईल तरी या सर्व गोष्टींचा विचार करून रविवार (दि. 11) पर्यंत सर्व बाजारपेठा उघडण्यास परवानगी द्यावी. अन्यथा सोमवार (दि. 12) पासून सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या नियमांना अधीन राहून आम्ही सर्व बाजारपेठ उघडणार आहोत, असा इशारा व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. निवेदन प्रांताधिकारी वाई, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, वाई पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. यावेळी व्यापारी संघटनानचे पदाधिकारी उपस्थित होते.

  गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आल्यापासून लॉकडाउन पडत आहेत. लॉकडाउनच्या समाजातील व्यावसायिक, शेतकरी, मजूर, असंघटित क्षेत्रातील लोकांना मोठा फटका बसत आहे. लॉकडाउन असले तरी कर्जावरील व्याज, गाळा भाडे, बँकाची वसुली, घरपट्टी, विज बिले, पाणीपट्टी, फायनान्सचे हप्ते थांबले नसून सामान्य माणूस घायकुतीला आला आहे. याचा विचार शासनाने करावा.

  – सचिन फरांदे, प्रतिनिधी, व्यापारी संघटना