ठाकरे सरकारच्या कारभारावर उदयनराजेंची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले…

सातारा : भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले(udayanraje bhosale) यांनी आपल्या खास शैलीत ‘ठाकरे सरकारच्या (thackeray government) कामाचा समाचार घेतला आहे. तसेच लवकरच भाजपचे सरकार सत्तेत येणार असल्याचे भाकीतही त्यांनी केले.

ठाकरे सरकारमध्ये एक वाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच भाजपचे सरकार सत्तेत येणार असून ते कसे येणार आहे, ते विचारू नका’ अस उदयनराजे म्हणाले.

एका वर्षात काय केलं? हे मला दिसले नाही. या सरकारने फक्त लोकांची दिशाभूल केली असल्याची टीकाही त्यांनी केली. साताऱ्यात पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पाहणीसाठी उदयनराजे भोसले पोवई नाक्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना पदवीधर निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.