उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार; हर्षवर्धन पाटील यांची माहिती

उदयनराजे यांनी ट्विट करून हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीविषयी माहिती दिली. तर हर्षवर्धन पाटील यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आपण उदयनराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय झालेला आहे. या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आंदोलनबाबत पुढाकार घेण्यास ते तयार आहेत, असे पाटील यांनी सांगितले आहे.

    सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. अशावेळी खासदार उदयनराजे भोसले हे देखील मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार असल्याची माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिलीय. पाटील यांनी आज सातारा इथं उदयनराजेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.

    सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली. यावरून भाजपने ठाकरे सरकारला घेरले असून, आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते व मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मराठा समाजातील प्रमुख लोकांशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली.

    उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार – हर्षवर्धन पाटील