silver gun found

संशयित आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे दोन फूट लांब, अंदाजे दीड किलो वजन असलेली चांदीची बंदूक आढळून आली. आरोपची अधिक चौकशी केली असता त्याने ही बंदुक उदयनराजेंच्या जलमंदीर पॅलेस येथून चोरल्याचे सांगितले.

सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje)  यांच्या जलमंदीर पॅलेस येथून सोमवारी (१० नोव्हेंबर) एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदुकीची (silver gun) चोरी केली होती. ती बंदूक साताऱ्यातील एका सोने-चांदीच्या व्यवसायिकाकडे तो विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी कारवाई करत या कामगाराला ताब्यात ( police caught the thief)  घेतलं.

संशयित आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे दोन फूट लांब, अंदाजे दीड किलो वजन असलेली चांदीची बंदूक आढळून आली. आरोपची अधिक चौकशी केली असता त्याने ही बंदुक उदयनराजेंच्या जलमंदीर पॅलेस येथून चोरल्याचे सांगितले. या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलमंदीर पॅलेस याठिकाणी माळी कामासाठी आलेल्या कामगाराने ही चोरी केल्याची बाब समोर आली. या बंदुकीची अंदाजे किंमत सुमारे १ लाख रुपये असल्याची माहिती आहे.