दुर्दैवी घटना! पावसामुळे आडोशाला बसलेल्या मजुरांवर मंदिराचे छत कोसळले ; १ ठार तर तीन गंभीर जखमी

विरकरवाडी म्हसवड, ता. माण येथे नवीन मायाक्का देवीच्या मंदिराचे बांधकाम सुरु असताना सोमवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान जोरदार पाऊस आल्याने बांधकामांवर काम करणारे आठ कामगार नजिकच जुने मायाक्का देवीच्या मंदिराच्या आडोशाला बसले होते. यावेळी जुने असलेले मायाक्काचे मंदिर हे शहाबाद फरशीचे गरडेल असलेले छत अचानक खाली कोसळले.

    म्हसवड : वीरकरवाडी, ता. माण येथे जोरदार पाऊस आल्याने मंदिराच्या आडोशाला बसलेल्या मजुरांवर मंदिराचे शहाबादी फरशीचे छत कोसळले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाले.

    विरकरवाडी म्हसवड, ता. माण येथे नवीन मायाक्का देवीच्या मंदिराचे बांधकाम सुरु असताना सोमवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान जोरदार पाऊस आल्याने बांधकामांवर काम करणारे आठ कामगार नजिकच जुने मायाक्का देवीच्या मंदिराच्या आडोशाला बसले होते. यावेळी जुने असलेले मायाक्काचे मंदिर हे शहाबाद फरशीचे गरडेल असलेले छत अचानक खाली कोसळले. यामध्ये चार मजूर गाडले गेले तर चार मजूर बाजूला सरकल्याने बचावले. यावेळी मोठा आवाज होताच गावांतील नागरीक मंंदिराच्या दिशेने पळाले. नजिकच जेसीबीचे काम सुरु होते. त्या जेसीबीने फरशी, लोखंडी अ‍ॅगल, माती, दगड बाजूला करुन चौघांनाही बाहेर काढले व हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असताना व्यकट पिराजी दुनवड (वय ७०) हा मयत झाला तर पिराजी खंडाचा कोळी (२२), भंडारकोवढे सोलापूर, महेश भोई (वय २३) सोलापूर, उद्धव गंगाराम गुंडवड (वय ५०) तांदुळवाडी परभणी हे तिघे गंभीर जखमी झाले. रामा नामदेव नरवडे, रा. परभणी, दत्ता माणिक गुंडवड (४०) परभणी, रवि नाथ बावडी (४०) भंडाराकवठे सोलापूर, आदिलशहा कोतवाल ( ३० ) सोलापूर हे किरकोळ जखमी झाले. माजी उपाध्यक्ष दिपक बनगर, रवी विरकर, आप्पा विरकर, हणमंत राखुंडे लक्ष्मण कर्ले, लुनेश शिवाजी विरकर सोपान जठरे आदी विरकरवाडी येथील तरुणांनी धाडसाने पुढे येवून अडकलेल्याचे जीव वाचवले. या अपघाताची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली आहे.