शहरातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात म्हसवडकरांनी पालिकेसमोर मांडलेला ठिय्या.
शहरातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात म्हसवडकरांनी पालिकेसमोर मांडलेला ठिय्या.

प्रशासनाच्या विरोधात शहरातील व्यापारी, नागरीक व आम्ही म्हसवडकर टिम ने टिय्या मांडला त्याला पाठींबा देण्यासाठी पालिकेतील गटनेते धनाजी माने व नगरसेवक गणेश रसाळ व पृथ्वीराज राजेमाने आदींनी उपस्थित राहुन प्रत्यक्ष ठिय्या मांडला मात्र यावेळी पालिकेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी दांडी मारल्याने म्हसवडकर जनता व व्यापार्यांबद्दल या महत्वाच्या पदाधिकार्यांना काही वाटत नाही का ? असा सवाल यावेळी उपस्थितांतुन विचारण्यात आला.

    म्हसवड : सातारा जिल्हा हळुहळु अनलॉक होवु लागला असताना म्हसवड शहर मात्र पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आल्याने चिडलेल्या म्हसवडकर नागरीकांनी व व्यापारीवर्गाने थेट पालिका कार्यालयासमोर ठिय्या मांडत प्रशासनाला याबाबतचा जाब विचारत अन्यायकारक लॉकडाऊन मागे घ्या त्याशिवाय न उठण्याचा निर्धार व्यक्त केल्याने अखेर पालिका मुख्याधिका ऱ्यांनी अठवड्यातुन ३ दिवस अनलॉक करण्याचे जाहीर केले.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सातारा जिल्हा हा रेडझोन राहिल्याने जिल्ह्यात जवळपास दिड महिन्यांपासुन पूर्णत: लॉकडाऊन सुरु आहे दि. ७ पासुन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अत्यावश्यक सेवा सुरु करण्यास परवानगी दिलेली असताना माण- खटावच्या प्रातांधिकार्यांनी म्हसवड शहर हे कंटेटमेंट झोन जाहीर करीत ते पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने म्हसवड शहरात एकच खळबळ उडाली आहे, वास्तविक जिल्हा लॉकडाऊन होण्यापुर्वी १५ दिवस अगोदरच म्हसवड शहर हे पुर्णपणे लॉकडाऊन असल्याने शहर बंदला जवळपास दोन महिने उलटुन गेले आहेत त्यामुळे शहरातील सर्व अर्थकारण कोलमडले असुन सर्वसामान्य वर्गाचे हाल सुरु आहेत, अशात प्रशासनाने आणखी कंटेटमेंटच्या नावाखाली लॉकडाऊन सुरु केल्याने नागरीकांतुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येवुन म्हसवडकरांनी दि. ८ रोजी याविरोधात पालिकेसमोर ठिय्या मांडण्याचा इशारा दिला होता त्यानुसार दि.८ रोजी शहरातील काही मोजकेच व्यापारी, नागरीक व आम्ही म्हसवडकर टिमचे कार्यकर्त्यांनी एकत्र येत पालिकेसमोर ठिय्या मांडल्याने प्रशासन गोंधळुन गेले, पालिका मुख्याधिकार्यांनी याठिकाणी धाव घेत नागरीकांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला मात्र जोवर निर्णय नाही तोवर उठणार नाही असा पवित्रा व्यापारी व नागरीकांनी घेतल्याने मनख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी मोबाईलवरुन प्रांताधिकार्यांशी संपर्क साधत नागरीक व व्यापार्यांच्या भावना त्यांना सांगितल्या यावर मुख्याधिकारी व नागरीक यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होवुन अखेर पालिका प्रशासनाने शहरातील लॉकडाऊन काही अंशी उठवत शहरात मंगळवार, गुरुवार व शुक्रवार असे ३ दिवस अनलॉक करण्यात येईल असे जाहीर केले. या ३ दिवसांव्यतीरिक्त शनिवार व रविवार शहर पुर्णपणे बंद राहील तर अनलॉक दिवशी सकाळी ८ ते ११ फक्त बँका व भाजीमंडई सुरु राहिल तर दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत फक्त किराणा मालाची दुकाने सुरु राहतील असे जाहीर करुन प्रत्येकाने यावेळी सोशल डिस्टन्शनचे काटेकोरपणे पालन करावे कोरोना नियमांचे पालन करणे बंधन कारक असल्याचे सुचित केले आहे, नियमांचे पालन न करणार्या दुकानावर कडक कारवाई करण्याचेही पालिका मुख्याधिकार्यांनी सुचीत केले आहे.

    म्हसवडकरांसोबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नाहीत का ?
    पालिका कार्यालयासोर प्रशासनाच्या विरोधात शहरातील व्यापारी, नागरीक व आम्ही म्हसवडकर टिम ने टिय्या मांडला त्याला पाठींबा देण्यासाठी पालिकेतील गटनेते धनाजी माने व नगरसेवक गणेश रसाळ व पृथ्वीराज राजेमाने आदींनी उपस्थित राहुन प्रत्यक्ष ठिय्या मांडला मात्र यावेळी पालिकेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी दांडी मारल्याने म्हसवडकर जनता व व्यापार्यांबद्दल या महत्वाच्या पदाधिकार्यांना काही वाटत नाही का ? असा सवाल यावेळी उपस्थितांतुन विचारण्यात आला.

    भाजी मंडई व किराणासाठी एकच वेळ ठरवावी 
    पालिका मुख्याधिकार्यांनी शहरातील भाजी मंडई व किराणा दुकाने यासाठी वेगवेगळी वेळ ठरवुन दिली असली तरी यामुळे शहरात दिवसभर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे पालिका प्रशासनाने सकाळी ९ ते दुपारी १२ अशी एकच वेळ भाजी मंडई व किराणासाठी द्यावी यानंतर सुरु असलेल्या दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही म्हसवडकर टिम ने निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे.