आयआयएकडून कामगारांसाठी लसीकरण मोहीम

बेल एअरने सरकारने दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी दरात म्हणजेच ७३० रुपये प्रती डोस या दराने लस व लसीकरणासाठी लागणारी वैद्यकीय सहायता देण्याचे मान्य केले. आयआयए सातारा शाखेने मोहिमेचे व्यवस्थापन केले.

    सातारा : दि इंडियन इन्सिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या सातारा शाखेच्यावतीने (आयआयए) छोटे उद्योजक व आस्थापनामधील कामगार व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी आयआयए सातारा शाखेच्यावतीने वास्तूविशारद ययाती टपळे व बेल एअर हॉस्पिटल पाचगणीचे फादर टॉमी यांच्या संकल्पनेतून लसीकरण मोहिम राबविण्यात अाली. जुन्या एमअाडीत लसीकरण झाले. ११३० जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

    बेल एअरने सरकारने दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी दरात म्हणजेच ७३० रुपये प्रती डोस या दराने लस व लसीकरणासाठी लागणारी वैद्यकीय सहायता देण्याचे मान्य केले. आयआयए सातारा शाखेने मोहिमेचे व्यवस्थापन केले. या संकल्पनेला आयआयए सातारा शाखेचे चेअरमन वास्तुविशारद सुहास तळेकर, व्हाईस चेअरमन वास्तुविशारद विपुल साळवणकर, सचिव वास्तुविशारद अनिरूध्द दोशी यांनी उचलून धरले. त्याच्या नियोजनाची संपुर्ण जबाबदारी संस्थेच्या तरूण सभासदांवर सोपविली. वास्तुविशारद मयुर गांधी व उपेंद्र पंडीत यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सल्ल्याने वास्तुविशारद श्रेयस वाळींबे, गौतम भुरके, हर्षवर्धन टपळे, स्वराली सगरे, स्नेहल शेडगे, वास्तुविशारद सुजाता तळेकर, अद्वैत पाटणकर, श्रीकांत उथळे, ओंकार घाडगे यांनी नियोजन केले.

    प्राणवायूसह आपत्कालीन सुविधा

    लसीकरणासाठी प्रशांत अहेरराव यांनी आपले दहा हजार चौरस फुटाचे शेड मोफत उपलब्ध करून दिले होते. केंद्रस्थानी संपुर्ण वेळ प्राणवायूसह आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसह कार्डीअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध ठेवण्यात आली होती. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केंद्रस्थळी भेट देवून संपूर्ण नियोजनाची पाहणी केली. कार्यकमास छोटे उद्योजक, आस्थापना, क्रेडाई सातारा व बीएआय सातारा यंच्या पदािधकाऱ्यांनी सहकार्य केले.