श्रीपतराव हायस्कूलमध्ये 450 जणांचे लसीकरण

    सातारा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ यांच्या श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये बाल सक्षमीकरण अभियानाअंर्तगत अठरा वर्षावरील 150 जणांचे तर 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 110 जणांचे लसीकरण करण्यात आले.

    खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व संस्थेचे सचिव तुषार पाटील यांनी पुढाकार घेऊन हे लसीकरण सत्र पार पाडले. स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे , नगरसेवक ज्ञानेश्वर फरांदे व कोविड डिफेंडर ग्रुपचे विनीत पाटील, आरोग्य विभागाच्या काकडे व इर्शाद तांबोळी यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले.

    जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या माझे मूल माझी जबाबदारी या अभियानाच्या पायलट प्रोजेक्टसाठी श्रीपतराव हायस्कूलची निवड करण्यात आली होती. श्रीपतराव पाटील हायस्कूल, आदर्श विद्या मंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व माणिक कासट बालक मंदिर या चारही शाखांमध्ये हा प्रकल्प हिरीरीने राबवण्यात आला. संस्थेच्या पावणेदोन हजार विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी बाल सक्षमीकरण अभियान राबविण्यात आले आहे. संस्थेने दोन टप्प्यात मोहिम राबवून अठरा वर्षांवरील 150 तर पंचेचाळीस वर्षावरील 110 अशा 260 जणांचे लसीकरण करण्यात आले.

    जिल्हा आरोग्य विभागाच्या परवानगी व सहकार्याने बालक आणि पालक यांच्या उत्तम आरोग्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे तुषार पाटील यांनी सांगितले . शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, शाळा समिती अध्यक्ष वत्सला डुबल, संचालक हेमकांची यादव, प्रतिभा चव्हाण, धनंजय जगताप,श्रीपतराव हायस्कूलचे मुख्याध्यापक रविंद्र फडतरे, पर्यवेक्षक अमर वसावे, क्रीडा शिक्षक यशवंत गायकवाड तसेच सर्व शाखा मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले .