आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नाने विलासपूरमध्ये लसीकरण

    सातारा : सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नाने विलासपूर नागरिकांसाठी विलासपूर ग्रामपंचायत कार्यालयात कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. विलासपूरमधील लोकांसाठी तेथील विकासकामासाठी कायम आग्रही भूमिका घेणारे स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

    विलासपूर लोकांची लसीकरणासाठी होणारी हेळसांड थांबवण्यासाठी कुमठे आरोग्य केंद्राच्या वतीने बुधवारी विशेष लसीकरण कॅम्पचे विलासपूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. विलासपूरमधील १३० नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले. यासाठी कुमटे आरोग्य केंद्राचे डॉक्टर शेलार, डॉक्टर अमोल पाटील, वैद्यकीय सहाय्यक रेखा माळके, अनिता आनंद, नजराना बागवान, सोनाली चव्हाण, साहिल आनंदे, अंगणवाडी सेविका यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

    लसीकरणासाठी पारेख काका, बाळासाहेब महामुलकर, शिवाजीराव कदम तसेच अनेक स्थानिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यावेळी विलासपूरचे ज्येष्ठ नेते पारेख काका, पंचायत समिती सदस्य आशितोष चव्हाण, उपसरपंच अभयराज जगताप, समाजसेवक फिरोज पठाण युवा कार्यकर्ते बाळासाहेब महामुलकर, ऍड नितीन शिंगणे, अमित महिपल, कनेरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रतिभा मोटे, किरवे, शिवेंद्रसिंहराजे मित्र समूहाचे निरंजन कदम, युवराज काळे, कोविड फायटरचे शशिकांत वणवे, आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.