दहा हजाराची लाच घेताना वनपाल लाचलुचपतच्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली संजय साळुंखे, संभाजी काटकर, विशाल खरात यांनी ही कारवाई केली . या प्रकरणातील तक्रारदार यांनी मौजे शिंदी खुर्द येथे केलेल्या माती बंधाऱ्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी वनविभागाकडे पाठपुरावा केला होता . दहिवडी येथील वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ यांनी हे बिल काढण्यासाठी दहा हजार रुपये लाच देण्याची मागणी केली . तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली

    सातारा : मौजे शिंदे खुर्द येथे माती बंधारा केलेल्या कामाच्या बिलाचा चेक काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना दहिवडी येथील वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) , रा सरकारी दवाखाना पिछाडी गायत्री निवास, दहिवडी ता माण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले . बुधवारी दुपारी वनविभागाच्या कार्यालय परिसरात कारवाई करण्यात आली .

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली संजय साळुंखे, संभाजी काटकर, विशाल खरात यांनी ही कारवाई केली . या प्रकरणातील तक्रारदार यांनी मौजे शिंदी खुर्द येथे केलेल्या माती बंधाऱ्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी वनविभागाकडे पाठपुरावा केला होता . दहिवडी येथील वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ यांनी हे बिल काढण्यासाठी दहा हजार रुपये लाच देण्याची मागणी केली . तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली . लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या सूचनेप्रमाणे पथकाने बुधवारी दुपारी वनविभागाच्या इमारतीसमोर सापळा रचून पोळ याला ताब्यात घेतले .मात्र आरोपीने ती रक्कम अज्ञात ठिकाणी फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला . लोकसेवक व परिसरात लाच रकमेचा शोध घेतला असता ती रक्कम मिळून आली नाही .आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली . पोळ याच्या गायत्री निवास या घराची झडती घेण्यात आली मात्र फारसे काही आढळून आले नाही असे पोलिसांनी सांगितले .