वर्धन अँग्रो घेतोय खाकी वर्दीतील जनतेच्या सेवकांची काळजी

कोरोना संसर्ग मोठया प्रमाणात पसरत असताना धीरोदात्तपणे सेवा बजावणाऱ्या बोरगाव व तळबीड पोलीस ठाण्यातील पोलिसांना कारखान्याचेचेअरमन धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशिल कदम यांच्या हस्ते मास्क,सॅनिटायझर व वाफारा मशीन चे वाटप करण्यात आले.

    दहिवडी : वर्धन अँग्रो कारखान्याच्या वतीने कोरोनाच्या वैश्विक महामारी मध्ये लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या हातांची सुद्धा काळजी घेणे गरजेचे असलेने सामाजिक भान ओळखून कोरोना संसर्ग मोठया प्रमाणात पसरत असताना धीरोदात्तपणे सेवा बजावणाऱ्या बोरगाव व तळबीड पोलीस ठाण्यातील पोलिसांना कारखान्याचेचेअरमन धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशिल कदम यांच्या हस्ते मास्क,सॅनिटायझर व वाफारा मशीन चे वाटप करण्यात आले. तसेच कारखान्या कडून काहीही मदत लागल्यास तात्काळ मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, तळबीड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील , वर्धन अँग्रोचे संचालक पृथ्वीराज निकम, अविनाश साळुंखे, संतोष घाडगे, यशवंत चव्हाण, अध्यक्ष सातारा तालुका काँग्रेस संतोष साळुंखे, शिवसेना कराड उत्तर अध्यक्ष शंकर साळुंखे,अध्यक्ष (किसान सेल) उमेश मोहिते, अजय माने, सचिन शहा, राजेंद्र गायकवाड, बाबासाहेब चव्हाण, शेती अधिकारी वैभव नलवडे, लेबर ऑफिसर रणजित चव्हाण व पोलीस स्टाफ उपस्थित होता.