व्हीआयपी वशिलेबाजीने साताऱ्यात लसीकरणाचा गोंधळ

रोजच्या लसीकरण कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यासाठी खमक्या अधिकाऱ्याची गरज आहे . मात्र मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे कुशल अधिकाऱ्यांची टंचाई आहे . काल लसीकरण केद्रावर बापट साहेब आल्यावर वशिलेबाजीचे बिंग फुटले . म्हणजे प्रशासनाने लक्ष घातल्यावरच सर्वसामान्यांना न्याय मिळणार का ? राजकीय दबावाच्या फेऱ्यात सर्वसामान्यांना किती नाडणार आहात ? वशिलेबाजी करणाऱ्या माजी नगरसेवकांना प्रशासनाने समज देण्याची मागणी होत आहे .

    सातारा : सातारा नगरपालिकेच्या भवानी पेठेतील कस्तुरबा रूग्णालयात माजी नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे लसीकरण कार्यक्रमाचा बट्टया बोळ झाला आहे . या रोजच्या वशिलेबाजीमुळे टोकनं मिळालेल्या नागरिकांचे लसीकरण होईनासे झाले असून ही जबरदस्तीची घुसखोरी थांबवा अशी आर्त हाक सातारकरांनी दिली आहे .

    सातारा पालिकेच्या येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्रामध्ये वशिलेबाजी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. टोकन असलेल्या नागरिकांना लस न देताच पिटाळले गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ही बाब नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे यांच्या निदर्शनास आणून दिली.

    त्यांनी प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले.मुख्याधिकारी अभिजित बापट यांना बोलवून त्यांच्यासमोर प्रकार मांडला.उद्या त्यांना लस देण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर पडदा पडला.

    साहेब देखल्या देवाला दंडवत नको