वाई पोलिसांची विनापरवाना वाळू वाहतुकीवर करडी नजर; पाच लाखांचा माल जप्त

    वाई : वाई पोलिस ठाण्यातील  वाहतूक विभागाचे रमेश पवार, सुजाता मोकाशी, सोनाली माने, वाहनचालक अमित गोळे हे पोलिस पथक वाईच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे आणि पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार (दि.२०) च्या रात्री पोलिस वाहनातुन वाई पाचवड रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल शिवशाहीसमोर रात्रगस्त घालत होते.

    त्यावेळी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास या पथकास खास खबऱ्यामार्फत खबर मिळाली कि बावधन बाजु कडुन एक वाळुने भरलेला डंपर वाईच्या दिशेने येत आहे हे पोलिस पथक बावधन नाका येथे सापळा लावुन डंपरची वाट पाहत असतानाच अचानक पणे भरघाव वेगात  डंपर आला पण चालकाने पोलिस पाहताच त्याने कसलाही विचार न करता व पोलिसांनी हात दाखवून देखील न थांबताच रस्ता ओला करत   वेगाने शिवाजी चौकाच्या दिशेने भरघाव वेगात सुसाट जात असताना या पथकाने चित्तथरारक पाठलाग करुन डंपरला पोलिस वाहन आडवे घालून अखेर डंपर थांबवला व चालकां कडे कसून चौकशी केली असता त्याने डंपर मध्ये ३ ब्रास वाळु असल्याचे सांगितले त्यास वाळु वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याने परवाना नसल्याचे सांगीतले. त्या वरील चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने मचिंद्र महेंद्र पिसाळ वय ३० वर्ष राहणार बावधन ता.वाई असे सांगितले आणी ज्ञानेश्वर हणमंत पिसाळ राहणार बावधन असे डंपरच्या  मालकाचे नाव सांगितले.

    पुढील कारवाईसाठी  या पोलिस पथकाने  वाळुने भरलेला डंपरसह  पाच लाख रुपयांचा मद्देमाल जप्त करुन वाई पोलिस ठाण्यात आणला आणी रितसर  डंपर क्र.  एम.एच.११ सी.एच.३१९७ या वरील चालक असणारा मचिंद्र महेंद्र पिसाळ राहणार बावधन याच्या विरुद्ध विना परवाना वाळूची  चोरटी वाहतुक करत असले बाबतची  वाहतुक शाखेचे हवलदार असलेले रमेश पवार यांनी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून त्याच्या वर गुन्हा दाखल  केला आहे .हि तक्रार आणी गुन्हा दाखल होताच    तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

    यापुढेही वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्या वाळूची वाहतुक करताना जो कोणी आढळून आल्यास अशा सर्वांन वर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली आहे .कुठल्याही अमीशाला बळी न पडता थेट तक्रार दाखल करून  गुन्हा दाखल  केल्या बद्दल या पथकाचे वाईच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे आणी पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी अभिनंदन केले आहे.