गज्या मारणेच्या टोळीतील १४ जणांना वाई पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात

गज्या मारणे याच्या टोळीतील अंदाजे १४ जणांना वाहनांनसह शिताफीने ताब्यात घेतल्याने वाई शहरातील टोळ्यामध्ये खळबळ ऊडाली आहे. त्याचबरोबर जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख धिरज पाटील या दोघांनी वाई पोलिसांनी या धाडसी केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे.या घटेनमुळे गज्या मारणे आणि त्याच्या टोळीचे सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी काही टोळी सक्रीय झाले असल्याचे समोर आले आहे.

    वाई : पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे याची टोळी वाई शहरातील नामवंत व्यक्तीला धमकी देऊन काही आर्थिक व्यवहार करण्यासाठी आल्याची माहिती खबऱ्यामार्फत वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ आपल्या डी बी पथकासह ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचार्यांना सोबत घेऊन वाई शहरात टोळी युध्द भडकण्याआधीच खबरदारीचा उपाय म्हणूवाई सातारा रस्त्यावरील भिमनगर तिकाटणे येथे सापळा रचला.
    या सापळ्यात गज्या मारणे याच्या टोळीतील अंदाजे १४ जणांना वाहनांनसह शिताफीने ताब्यात घेतल्याने वाई शहरातील टोळ्यामध्ये खळबळ ऊडाली आहे. त्याचबरोबर जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख धिरज पाटील या दोघांनी वाई पोलिसांनी या धाडसी केलेल्या कारवाईचे कौतुक केले आहे.या घटेनमुळे गज्या मारणे आणि त्याच्या टोळीचे सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी काही टोळी
    सक्रीय झाले असल्याचे समोर आले आहे.