कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाईचा सोमवारचा आठवडे बाजार बंद; वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापुरकर यांचे आदेश

मागील वर्षी घडलेल्या इतिहासाची पुर्नरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेची असल्याबाबतचा अहवाल दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी संगीता राजापुरकर - चौगुले यांच्या दालनामध्ये झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कोरोना आढावा बैठकीत सादर करण्यात आला होता.   प्रांताधिकारी यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने शहरासह तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाने थैमान घालू नये म्हणून सोमवार २९ रोजीपासून पुढील आदेश मिळेपर्यंत आठवडा बाजारावर बंदी घातली आहे.

    वाई: वाई तालुक्यातील जवळपास १०० गावातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाची विक्रीसाठीचा वाई शहराच्या मध्यवस्तीत दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार कोरोनाचे वाढते संकट थोपविण्यासाठी बंद करण्याचे आदेश वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर-चौगुले यांनी दिले आहेत.  शहराच्या मध्यवस्तीत वाई तालुक्यातील शंभर गावातील शेतकर्यांंनी पिकविलेला शेतमाल वाईच्या आठवडी बाजारात सोमवारी विक्रीसाठी आणतात. तसेच खेळणी, कपडे, फळ विक्रेते, किराणा दुकानदार व इतर जिवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी शेतकर्यां सह व्यापारी वर्ग, छोटे व्यावसायीक मोठया प्रमाणात येथे येतात.

    समांतर अंतर न ठेवता, तोंडाला मास्क न बांधता येथे लोक खरेदीसाठी गर्दी करतात. यावेळी विक्रेते हे समोरच्या ग्राहकाला विक्रीची देवाण घेवाण करताना कोणतीही काळजी घेत नसल्याने कोरोनाला निमंत्रण देताना दिसतात. याची पाहणी वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ व त्यांच्या कर्मचार्यांडनी करून शहरातील वाढती गर्दी पाहता गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना रोगाने शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनाचा गतीने फैलाव होवून अनेकजण बाधीत झाले. तर अनेकांना प्राण गमवावे लागले. असा मागील वर्षी घडलेल्या इतिहासाची पुर्नरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेची असल्याबाबतचा अहवाल दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी संगीता राजापुरकर – चौगुले यांच्या दालनामध्ये झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कोरोना आढावा बैठकीत सादर करण्यात आला होता.

    प्रांताधिकारी यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने शहरासह तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाने थैमान घालू नये म्हणून सोमवार २९ रोजीपासून पुढील आदेश मिळेपर्यंत आठवडा बाजारावर बंदी घातली आहे. बंदीच्या आदेशाचा कोणीही उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याची नोंद शेतकरी, व्यापारी, व्यवसायीकांनी घ्यावी असे आवाहन वाईच्या प्रांताधिकारी यांनी केले आहे.