खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरात शिरले ओढयाचे पाणी

अतिक्रमाणांची आम्ही पाहणी केली असून, तलाठी आणि सर्कल यांना प्रवाह नैसर्गिक करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. बांधकाम मोठे असून सदरच्या बांधकाम व्यावसायिकांने परवागी घेतली असेल असे वाटते. मात्र, तरीही त्याची सर्व माहिती घेवून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच व्यावसायिकाने अतिक्रमण केले असल्यास ते काढून घेतले जाईल, अशी माहिती कराडचे तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले.

    सातारा : ओढ्यावर अतिक्रमण करून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह वळविल्याने साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी ओढ्याचे पाणी शिरले. कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

    मंगळवारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने कराडनजीकच्या गोटे गावात असलेल्या खासदार पाटील यांच्या निवासस्थानी व कार्यालयात पावसाचे पाणी शिरले. बांधकाम व्यावसायिकाने ओढ्यावर अतिक्रमण करून त्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्याने हा प्रकार घडला. सुदैवाने खासदारांच्या निवासस्थानाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.