वाई तालुक्यात विकएंड लॉकडाऊनला कडकडीत बंद ; प्रशासनाच्या हाकेला नागरिकांची साद

वाई नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी काही व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्या परंतु नगरपालिका कर्मचाऱ्यांनीच तोंडाला मास्क न लावता कारवाई करण्यात आल्याच्या कारणास्तव व्यापारी नागरिक व वाईनगरपालिका कर्मचारी यांच्यामध्ये दंड भरण्यावरून 'तू तू मै मै' झाल्याच्या घटना घडल्याचे चित्र काही ठिकाणी पहायला मिळाले. अनेकांनी याबाबत प्रसार माध्यमाकडे विना मास्क कर्मचाऱ्यांचे फोटो पाठवून वाई नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वर्तणुकी बाबत नाराजी व्यक्त केली.

    वाई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वाई शहरासह तालुक्यातील कोरोना रोगाच्या वाढत्या महामारीला थोपवण्यासाठी जिल्हा व वाई तालुका प्रशासनाने शनिवार व रविवार या दिवशी विकएंड लॉकडाऊन जाहीर केले होते. प्रशासनाने जाहीर केलेल्या विकएंड लॉकडाऊन कडकडीत बंद पाळत वाई शहर व तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या हाकेला उत्तम साद दिली. अत्यावश्यक सेवा व काही किरकोळ अपवाद वगळता सर्व व्यवहार व नागरिकांनी संचार बंदीचे आदेश तंतोतंत पाळल्याचे चित्र वाई शहर व संपूर्ण तालुक्यात पहायला मिळाले. ग्रामीण भागातील नागरिकांनी वाई शहराकडे न फिरकता आपल्या गावातच रहाणे पसंत केले. काही उत्साही लोकांनी प्रशासनाचे नियम डावलून विनाकारण फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला अशांना प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईचा फटका सहन करावा लागला. राज्य शासनाच्या आदेशा नुसार जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या १४४ कलमांची अंमलबजावणी करण्यासाठी वाई तालुका प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान अंशतः लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आठवड्याच्या शनिवार व रविवार विकएंड दिवशी पुर्णतः लॉकडाऊन घोषित केले होते.

    एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासून वाई शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रोगाचा फैलाव,प्रसार वाढत आहे रोज ५० ते ८० कोरोना रुग्ण नव्याने आढळून येत आहेत तरीही बहुतांशी नागरिकांची बाजारात,सार्वजनिक ठिकाणी गर्दी उसळलेली पहायला मिळत होती. रोजच्या गर्दीच्या महापुराला आवर घालणे प्रशासनाला अवघड झाले होते पोलिस प्रशासन मोकाट फिरणाऱ्या लोकांवर दररोज कारवाईचा बडगा उचलून ठोस दंडात्मक कारवाई करत होते. तरीही नागरिक प्रशासनाची नजर चुकवून गर्दीचा उच्चाक मोडीत काढत होते . परिणामी कोरोनाच्या विषाणूने वाई शहर व तालुक्यात पुन्हा डोकेवर काढल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत रोजच वाढ होत राहिली पर्यायी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून वाढत्या बेशिस्तीला लगाम घालण्या करता प्रशासनाला लॉकडाऊनचे हत्यार पुन्हा बाहेर काढणे क्रमप्राप्त झाले आहे. याचे नागरिकांनी भान ठेवणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून बोलले जात असून कोरोना विषाणू रोगाच्या संसर्गाला रोखणे सर्वस्वी नागरिकांच्याच हातात असल्याने सर्वानी लॉकडाऊनचे काटेकोर नियम पळून प्रशासनाला सहकार्य करण्याची भावना अधिकारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

    वाई नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी काही व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्या परंतु नगरपालिका कर्मचाऱ्यांनीच तोंडाला मास्क न लावता कारवाई करण्यात आल्याच्या कारणास्तव व्यापारी नागरिक व वाईनगरपालिका कर्मचारी यांच्यामध्ये दंड भरण्यावरून ‘तू तू मै मै’ झाल्याच्या घटना घडल्याचे चित्र काही ठिकाणी पहायला मिळाले. अनेकांनी याबाबत प्रसार माध्यमाकडे विना मास्क कर्मचाऱ्यांचे फोटो पाठवून वाई नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वर्तणुकी बाबत नाराजी व्यक्त केली.