Sharad Pawar, don't lie too much ... Sadabhau will attack Pawar nrvk

शरद पवार यांनी कुठे कुस्त्या खेळल्या, कुठे लंगोट शिवली तरीही ते कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष, कुठे बॅटींग अन बॉलिंग केली तरीही ते क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. पवारांचे वागणे म्हणजे ‘चीत भी मेरी अन‌् पट भी मेरा’ असे आहे, असा हल्लाबोल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केला.

  सातारा : शरद पवार यांनी कुठे कुस्त्या खेळल्या, कुठे लंगोट शिवली तरीही ते कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष, कुठे बॅटींग अन बॉलिंग केली तरीही ते क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. पवारांचे वागणे म्हणजे ‘चीत भी मेरी अन‌् पट भी मेरा’ असे आहे, असा हल्लाबोल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जे लिहिले आहे, तेच कृषीनिती आणि तीन कृषी विधेयकांमध्ये आहे, असा िचमटा खाेत यांनी काढला.

  िक्रकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी िदल्लीतील अांदाेलनावरुन केलेल्या िट्वटवर पवार यांनी सचिनने आपले क्षेत्र साेडून बाेलताना काळजी घ्यावी, असा सल्ला िदला हाेता. त्याचा धागा पकडत खाेत यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र साेडले. सचिनला शेतकऱ्यांबाबत ज्ञान नसले, तरीही तो जे अन्न खातो त्याची त्याला जान असते, अशा शब्दात खाेत यांनी सचिनची पाठराखण केली.
  सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे शंकर शिंदे, मधुकर जाधव, सचिनकुमार नलवडे, प्रकाश साबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
  खोत म्हणाले, दोन महिन्यापेक्षा जास्त काळ सुरु असलेलं आंदोलन हे नेमकं कोणत्या उद्देशाने सुरु आहे. शंकास्पद आहे. जे लोक मोदींना जनाधाराच्या माध्यमातून हरवू शकत नाहीत. ते शेतकऱ्यांचा बुरखा आंदोलनात शिरले आहेत. त्यांना ना शेतकऱ्यांची चिंता, ना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची. देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर शेती उत्पादन पिछाडीवर होते. १९६५ नंतर नवे तंत्रज्ञान आले. अनेक उत्पादन वाढवली.

  आता प्रश्न उत्पादन वाढवण्याचा नाही. वाढलेलं उत्पादन विकण्याचा आहे. मार्केट उपलब्ध करण्याचा प्रश्न आहे. तोच प्रश्न सोडविण्यासाठी हे तीन कृषी विधेयक आणले आहेत. ७० वर्षात जे झाले नाही ते आता होत आहे. जसे घुबडाला उजेडाची भीती असते. तसे काही घुबडांना शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करुन अंधाराच साम्राज्य हवं आहे. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांचे खळ लुटता येईल, असे त्यांना वाटते.
  -सदाभाऊ खाेत, माजी कृषीमंत्री