…मग मराठा समाजाचे नेते का येऊ शकत नाहीत? : विनायक मेटे यांचा सवाल

मराठा समाजातील मुलांना सहानुभुती द्यायची सोडून मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण जागचे हललेले नाहीत. मराठा समाजातील लोकांना वेड्यात काढायचं काम सध्या राज्य सरकार कडून सुरू असल्याचा आरोप मेटे यांनी यावेळी केला आहे.

    सातारा : ओबीसी समाजाचे नेते आरक्षणासाठी एकत्र येऊ शकतात मग मराठा समाजाचे नेते का येऊ शकत नाहीत?, असा सवाल शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केला आहे. मराठा आरक्षण आणि इतरही काही महत्त्वांच्या विषयांवर त्यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

    ओबीसी समाजाचे नेते आणि आमदार ओबीसी आरक्षणासाठी एकत्र येवू शकतात, मग मराठा समाजातील नेते, लोक प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी का एकत्र येऊ शकत नाही?, असा सवाल उपस्थित करत मराठा आमदारांना एकत्र घेऊन बैठक घेणार असल्याचं साताऱ्यात जाहीर केले आहे. येणाऱ्या काळात मराठा समाजातील लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं.