कोविड नियंत्रण, उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही : शंभूराज देसाई

मोठ्या मतदारसंघातही सामाजिक जाणिवेने काम करता येते,हे आमदार मकरंद पाटील यांनी दाखवून दिले आहे.त्यांच्यावरचा कामाचा बोजा अन्य कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घ्यावा.खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले,जनतेच्या सुखदुःखाची कदर करण्यामुळेच मकरंद पाटील जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करु शकले आहेत.रात्री -अपरात्रीही जनतेच्या हाकेला धावणाऱ्या आमदारांनी कष्ट, लोकसहभागातून उभे केलेले हॉस्पिटल सामान्यांना आधार ठरेल.

    गतवर्षीच्या आणि या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात कोविड साथ नियंत्रण व उपचारासाठी जिल्हा निधीतून ३३ टक्के रक्कम खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याने कोविड उपचारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.अशी ग्वाही राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

    शेंदुरजणे येथे वाई तालुका मॅप्रो कोविड सेंटरचा लोकार्पण समारंभात ते बोलत होते.खासदार श्रीनिवास पाटील,आमदार मकरंद पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या हस्ते हॉस्पिटलचा लोकार्पण समारंभ संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण,सभापती सौ. संगीता चव्हाण,मॅप्रो फूडसचे निकुंज व्होरा,नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे, गरवारे इलेक्ट्रिकल फायबर्सचे वैभव जोशी याची प्रमुख उपस्थिती होती.

    देसाई पुढे म्हणाले, मोठ्या मतदारसंघातही सामाजिक जाणिवेने काम करता येते,हे आमदार मकरंद पाटील यांनी दाखवून दिले आहे.त्यांच्यावरचा कामाचा बोजा अन्य कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घ्यावा.खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले,जनतेच्या सुखदुःखाची कदर करण्यामुळेच मकरंद पाटील जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करु शकले आहेत.रात्री -अपरात्रीही जनतेच्या हाकेला धावणाऱ्या आमदारांनी कष्ट, लोकसहभागातून उभे केलेले हॉस्पिटल सामान्यांना आधार ठरेल.

    आमदार मकरंद पाटील यांनी मॅप्रो फूडस,गरवारे इलेक्ट्रिकल फायबर्स,जिल्हा परिषद,जिल्हा प्रशासन,मिशन हॉस्पिटल आदींच्या सहभागातून ३० आॅक्सिजन व ६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केल्याचे सांगितले.अदयाप सुविधेचा गरजेनुसार विस्तार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.तळदेव, महाबळेश्वर,पाचगणी,वाई, कवठे, खंडाळा, लोणंद येथील कोरोना सेंटर्स मधून ३५०-४०० बेड उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    तहसीलदार रणजित भोसले,गट विकास अधिकारी,उदयकुमार कुसुरकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शेडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप यादव,पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी स्वागत केले.विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले.प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांनी आभार मानले. मॅप्रो व गरवारे चे प्रतिनिधी,हॉस्पिटल उभारणीसाठी काम करणाऱ्या तंत्रज्ञाचा यावेळी सत्कार करण्यात आला.