महाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण

बहुसंख्य युझर्सनी उत्सवात सहभागी होताना व्हर्च्युअल (Virtual) पद्धतीने आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यास प्राधान्य दिल्याचे सीएमआरच्या सर्वेक्षणातील माहितीतून समोर येते. यामुळे स्मार्टफोनमधील आवाजाची गुणवत्ता (voice quality) अधिक चांगली असावी अशी ग्राहकांची मागणी वाढली आहे, कारण तल्लीन करणाऱ्या अनुभवामध्ये आवाज महत्त्वाची भूमिका बजावतो, मग ते माहिती मिळवण्यासाठी असो वा मनोरंजनासाठी असो.

    गेल्या वर्षभरात स्मार्टफोन (smartphone) हे पूर्वीपेक्षाही अधिक प्रमाणात आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाले आहेत. आपली मानवी संवादाची गरज (The need for human communication) आणि सामाजिक अंतर (Social Distancing) हा नवीन नियम असताना दर्जेदार आवाजाचे स्मार्टफोन (Best Voice Smartphone) आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राथमिक स्रोत आहे. सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर) या आघाडीच्या भारतीय तंत्रज्ञान बाजारपेठ संशोधन फर्मने आज त्यांच्या CMR Spotlight Survey 2021: महाराष्ट्रासाठी स्मार्टफोनमधील आवाजाचे महत्त्व (The importance of sound in smartphones) या सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले.

    गणेश चतुर्थीच्या सणादरम्यान, बहुसंख्य युझर्सनी उत्सवात सहभागी होताना व्हर्च्युअल (Virtual) पद्धतीने आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यास प्राधान्य दिल्याचे सीएमआरच्या सर्वेक्षणातील माहितीतून समोर येते. यामुळे स्मार्टफोनमधील आवाजाची गुणवत्ता (voice quality) अधिक चांगली असावी अशी ग्राहकांची मागणी वाढली आहे, कारण तल्लीन करणाऱ्या अनुभवामध्ये आवाज महत्त्वाची भूमिका बजावतो, मग ते माहिती मिळवण्यासाठी असो वा मनोरंजनासाठी असो. महाराष्ट्रातील 4 पैकी प्रत्येक 3 सामान्य नवीन स्मार्टफोन युझर्स स्मार्टफोन खरेदी करताना दर्जेदार आवाजाला सर्वाधिक प्राधान्य देतात (They prefer quality sound).

    घरगुती अर्थव्यवस्थेमध्ये, उपभोक्त्यांमधील कंटेंटचा वापर अनेकपटींनी वाढला आहे. अनेक युझर्स त्यांच्या स्मार्टफोनवर कंटेंट पाहत असताना उत्कृष्ट दर्जेदार आवाजाच्या अनुभवाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

    प्रभू राम, प्रमुख-इंडस्ट्री इंटेलिजन्स ग्रुप, सीएमआर यांच्या मते, “महाराष्ट्राचे स्मार्टफोन युझर्स महत्त्वाकांक्षी आहेत, त्यांच्या स्मार्टफोनवर सक्रियपणे कंटेंट पाहतात आणि त्यांना सर्वोत्तम अनुभव हवा असतो. स्मार्टफोनचा वापर वाढलेला असताना ते अधिक चांगला, अधिक शुद्ध आवाजाच्या गुणवत्तेची मागणी करतात. डॉल्बीसारख्या आघाडीचे तंत्रज्ञान पुरवठादार, विशेषतः स्मार्टफोनसह सर्व उपकरणांमध्ये समृद्ध आणि तल्लीन करणारा अनुभव देऊन, या वापरकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करत आहे.”

    सीएमआर स्पॉटलाईट सर्वे 2021 : स्मार्टफोनमधील आवाजाचे महत्त्व, भारतीय उपभोक्त्यांमधील आवाजाचा वापर करण्याच्या विविध सवयी अधोरेखित करतो आणि महाराष्ट्रातील युझर्स आता कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा याची निवड करताना उत्कृष्ट दर्जेदार आवाजाला प्राधान्य देत आहेत आणि त्याची मागणी करत आहेत हे या सर्व्हेक्षणाने दाखवून दिले आहे.

    महाराष्ट्रातील सर्वेक्षणाचे काही महत्त्वाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत:

    आवाज हाच राजा आहे :

    स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आवाज हा त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे, त्यातून त्यांना भावनिक शक्ती आणि त्यांच्या उच्च डिजिटल ओव्हरलोडमधून सुटका मिळते.

    दर्जेदार आवाज ग्राहकांना अधिक जवळ आणतो :

    69% प्रतिसादकांना असे वाटते की सामायिक आवाजाच्या अनुभवातून ते मित्र आणि कुटुंबीयांशी अधिक जोडलेले असतात.

    संगीत (92%), चित्रपट (75%) आणि युट्यूबवरील वापरकर्त्यांनी तयार केलेले व्हिडिओ (73%) हे स्मार्टफोनवरील तीन सर्वाधिक प्राधान्य असलेले कंटेंटचे प्रकार आहेत.

    गुणवत्ता महत्त्वाची आहे :

    महाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन वापरकर्त्यांना स्मार्टफोनच्या आवाजाचा अनुभव अधिक तल्लीन करणारा आणि शुद्ध असायला हवा आहे, जो त्यांना कंटेंटची खोली आणि तपशीलाचा अनुभव देतो.

    उत्कृष्ट अनुभवाला मागणी :

    महाराष्ट्रातील 94% स्मार्टफोन युझर्स त्यांच्या स्मार्टफोनवर त्यांचे चित्रपट आणि संगीताचा अनुभव उंचावण्यासाठी डॉल्बी ॲटमॉससारख्या ध्वनी तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतात.

    भारतामधील स्मार्टफोन बाजारपेठ प्रचंड वेगाने वाढत आहे. अनेक वर्षांपासून मोबाईल फोन हे वापरकर्त्यांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि तंत्रज्ञान आपलेसे करण्यासाठी भौगोलिक अडथळ्यांवर आणि सामाजिक-आर्थिक दर्जावर मात करण्यास सक्षम करणारे महत्त्वाचे उपकरण म्हणून उदयाला आले आहे. आजचे उपभोक्ते वाढत्या प्रमाणात सजग आहेत आणि ते जिथे जातील तिथे उत्कृष्ट, तल्लीन करणाऱ्या अनुभवांची मजा घेण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनवर दर्जेदार आवाजाची मागणी करतात.

    सीएमआर स्पॉटलाईट सर्वे 2021: स्मार्टफोनमधील आवाजाचे महत्त्व याविषयी

    सीएमआर स्पॉटलाईट सर्वे 2021:

    स्मार्टफोनमधील आवाजाचे महत्त्व, या सर्व्हेक्षणामध्ये 18 ते 40 या वयोगटांमधील, आणि SEC A आणि SEC B या सामाजिक-आर्थिक स्तरांमधील 400 पेक्षा अधिक स्मार्टफोन वापरकर्त्यांची पाहणी करण्यात आली. हे सर्वेक्षण जुलै 2021 मध्ये मुंबई आणि पुण्यात घेण्यात आले होता.

    या साईजच्या यादृच्छिक पद्धतीने निवडलेल्या नमुन्यावर आधारित निष्कर्षांसाठी, 95% विश्वास आहे की, निष्कर्षांमध्ये संपूर्ण लोकसंख्येचे सर्व्हेक्षण केले असते तर त्यानुसार या सर्व्हेक्षणामध्ये अधिक किंवा वजा 3% सांख्यिकीय अचूकता आहे.